देवेंद्र फडणवीसांनी सध्या विधानसभा निवडणुकीच प्रचार सभांचा धडाका लावला आहे. गुरूवारी त्यांनी नांदेडच्या किनवट मतदार संघात प्रचार सभा घेतली. यावेळी त्यांनी महायुती सरकारच्या योजनांची माहिती मतदारांना दिली. शिवाय महाविकास आघाडीच्या नेत्यांवर जोरदार टीका केली. लाडक्या बहीणींना मतदानाचे आवाहन करत दाजींनाही आता आम्हालाच मतदान करायला सांगा असे सांगितले. शिवाय महाविकास आघाडीचे सरकार आले तर काय होईल याची भितीही त्यांनी यावेळी व्यक्त केली.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
किनवट विधानसभा मतदार संघातील भाजप उमेदवार भिमराव केराम यांच्या प्रचारासाठी देवेंद्र फडणवीस आले होते. त्यावेळी त्यांनी महायुती सरकारनं अडीच वर्षात ट्वेंटी ट्वेंटीची बॅटींग केली आहे. आता पुढील पाच वर्ष आम्ही अशी बॅटींग करू की एकही प्रश्न शिल्लक राहाणार नाही असा दावा फडणवीसांनी यावेळी केला. मराठवाड्याला आम्हाला पाणीदार करायचं आहे. दुष्काळी भाग ही ओळख आम्हाला पुसायची आहे. त्यासाठी पश्चिम वाहीन्या नद्यांचे पाणी मराठवाड्यात आणले जाईल असेही त्यांनी सांगितले. त्यासाठी पैसे भरपूर लागणार आहेत. पण त्यात आम्ही कमी पडणार नाही असे ही ते म्हणाले.
ट्रेंडिंग बातमी - ठाकरे गटाचा वचनमाना जाहीर; उद्धव ठाकरेंनी काय दिलीत आश्वासने?
लेक लाडकी योजने पासून लाडकी बहीण योजनेपर्यंत सारख्या योजना महायुती सरकारने आणल्या आहेत. लेक लाडकी योजनेत मुलीला वयाच्या आठराव्या वर्षी एक लाख रूपये मिळणार आहेत. तर लाडकी बहीण योजनेत दर महा दिड हजार मिळत आहेत. नोव्हेंबरपर्यंतचे पैसे जमा झाले आहेत. मात्र ही योजना बंद व्हावी म्हणून मविआचे लोक कोर्टात गेले आहेत. शिवाय जर महाविकास आघाडीचे सरकार आले तर उद्धव ठाकरे ही योजना बंद करणार आहेत. त्यांनी तसे जाहीर पणे सांगितले आहे. महायुतीच्या योजना आम्ही बंद करणार असे ते सांगत आहे. शरद पवार आणि नाना पटोले ही असचं बोलत आहे.
ट्रेंडिंग बातमी - शिंदे आणि राज यांच्यात काय बिनसलं? मुख्यमंत्र्यांनी पहिल्यांदाच तोंड उघडलं
लाडक्या बहीणांनी पैसे मिळत आहे. ते या सावत्र भावांना पहावत नाही. त्यामुळेच ते या योजना बंद करण्याच्या मागे लागले आहेत. त्यामुळे बहीणांनी जबाबदारी आता वाढली आहे. त्यांनी तर आम्हाला मतदार करावेच, पण लाडक्या दाजीलाही मतदान करायला सांगावे असेही आवाहन त्यांनी केले. महायुती आहे तर गती आहे. महाराष्ट्राची प्रगती आहे. असे म्हणत महायुतीचे सरकार आणा. मविआचे सरकार आले तर या सर्व योजना बंद केल्या जातील अशी भिती त्यांनी व्यक्त केली.
दरम्यान महायुती सरकारने मोठ्या प्रमाणात रोजगार देण्याचा संकल्प केला आहे. मराठवाड्यातली 80 हजार कोटीची गुंतवणूक आणली आहे. प्रत्येक तालुक्यात रोजगार कसा मिळेल हा महायुतीचा प्रयत्न आहे असेही ते म्हणाले. 10 लाख तरूणांना काम देण्याची योजना सरकारने आणली आहे. शिवाय पुढच्या काळात 25 हजार रोजगार निर्मितीचे लक्ष असल्याचेही ते म्हणाले. महिलांना सक्षम करण्यासाठीही पावले उचलली आहेत असे फडणवीसांनी आवर्जून सांगितले.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world