पालघरमध्ये चाललंय काय? एका मागोमाग नेते का होत आहेत गायब?

माजी आमदार अमित घोडा आणि त्यांच्या पाठोपाठ जगदीश धोडी आणि प्रकाश निकम हे बंडखोर उमेदवार देखील नॉटरीचेबल झाले. त्यामुळे महायुतीच्या नेत्यांबरोबरच उमेदवारांचे टेन्शन वाढले आहे.

जाहिरात
Read Time: 3 mins
पालघर:

पालघर जिल्ह्यात पालघर, बोईसर आणि विक्रमगड या तीन विधानसभा मतदारसंघात महायुतीला बंडखोरीचे ग्रहण लागले आहे. पालघर मधून विधानसभेची उमेदवारी नाकारल्याने नैराश्यातून नॉटरीचेबल झालेले माजी आमदार श्रीनिवास वनगा तीन दिवसांनी घरी परतले. मात्र वनगानंतर माजी आमदार अमित घोडा आणि त्यांच्या पाठोपाठ जगदीश धोडी आणि प्रकाश निकम हे बंडखोर उमेदवार देखील नॉटरीचेबल झाले. त्यामुळे महायुतीच्या नेत्यांबरोबरच उमेदवारांचे टेन्शन वाढले आहे. पण हे एका मागून एक नेते गायक का होत आहेत याची चर्चा सध्या जिल्ह्यात रंगली आहे. 

'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

पालघर विधानसभेचे विद्यमान आमदार श्रीनिवास वनगा यांचा शेवटच्या क्षणी तिकीट कापल्याने नैराश्यात गेले होते. त्यानंतर ते गायब झाले. आमदार वनगा अखेर तीन दिवसांनी घरी परतले. घरी येताच वनगा यांचा मुख्यमंत्री शिंदे यांच्या विरोधातील सुरू बदलला. यांनी पक्षा सोबत कायम राहणार असल्याचे जाहीर करून  नाट्यावर पडदा टाकला होता. पालघर विधानसभेसाठी बोहल्यावर चढायला इच्छुकांची मोठी गर्दी होती. मात्र लोकसभेला तिकीट कापलेले राजेंद्र गावित यांनी पुन्हा स्वगृही परतत अधिकृतपणे उमेदवारीची माळ गळ्यात पाडून घेतली. 

ट्रेंडिंग बातमी - 'ज्यांना गद्दार म्हटलं जातं ते मुख्यमंत्री होतात' भाजपचा नेता हे काय बोलला?

त्यामुळे माजी आमदार अमित घोडा हे पण नाराज झाले. त्यामुळे माजी आमदार अमित घोडा नाराज होऊन त्यांनीही राजेंद्र गावित यांच्या विरोधात महायुतीमध्ये बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. आता माजी आमदार अमित घोडा गेल्या 24 तासांपासून नॉट रिचेबल झाले आहेत. वरिष्ठांकडून समजूत काढण्यासाठी फोन येत असल्याने अमित घोडा नॉट रिचेबल झाल्याची माहिती मिळत आहे. परंतु अमित घोडा हे रिचेबल होतील फोन चालू करतीलच असा विश्वास भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला आहे. घोडा हे सध्या भाजपमध्ये आहेत.  

ट्रेंडिंग बातमी -  मनसेची बदलती भूमिका अन् 2024 ची निवडणूक! राज ठाकरेंनी काय काय केलं?

आमदार वनगा यांच्यानंतर पालघर जिल्ह्यातील शिवसेना शिंदे गटाचा आणखी एक बडा नेता मागील तीन दिवसांपासून नॉट रीचेबल झाला आहे. शिवसेना शिंदे गटाचे आदिवासी राज्य संघटक आणि कोकण पाटबंधारे विकास महामंडळाचे माजी उपाध्यक्ष जगदीश धोडी मागील तीन दिवसांपासून नॉट रीचेबल आहेत. जगदीश धोडी यांनी बोईसर विधानसभेचे शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार विलास तरे यांच्या विरोधात बंडखोरी करत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. 

Advertisement

ट्रेंडिंग बातमी - दादांची आबांवर टीका, शरद पवार पहिल्यांदाच बोलले, अजित पवारांना थेट सुनावले

"काम करू नये, फक्त हुजरेगिरी करावी म्हणजे तिकीट मिळतं असा आरोप पालघर जिल्हापरिषदेचे विद्यमान अध्यक्ष प्रकाश निकम यांनी केला आहे. निकम हे मुख्यमंत्र्यांचे कट्टर समर्थक समजले जातात. महायुतीचं मेरिट काय आहे. हेच मला समजत नाही असा प्रश्नही त्यांनी केला आहे. तिकीटाचे आश्वासन देऊन शब्द फिरवल्याने कार्यकर्त्यांमध्ये नाराजी आहे. त्यामुळे प्रकाश निकम यांनी विक्रमगडमधून उमेदवारी अर्ज दाखल करत बंडाचा पवित्रा घेतला आहे. प्रकाश निकम हे देखील शुक्रवारपासून नॉट रिचेबल आहेत. 

ट्रेंडिंग बातमी - पक्षाने तिकीट कापलं, भाजप बंडखोरानं थेट अहमदाबाद गाठलं, अमित शाहांच्या भेटीत काय घडलं?

जगदीश धोडी आणि प्रकाश निकम हे दोघेही शिवसेनेकडून बोईसर आणि विक्रमगड विधानसभा मतदारसंघासाठी प्रबळ दावेदार होते. मात्र ऐनवेळी तिकीट न मिळाल्यामुळे दोघांनीही तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. दरम्यान, उद्या 4 नोव्हेंबर रोजी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे. अर्ज मागे घेण्यासाठी पक्ष नेतृत्वाकडून दबाव येत असल्याने दोन्ही बंडखोर उमेदवार  मोबाईल संपर्क बाहेर असल्याची माहिती मिळत आहे. उमेदवारी अर्ज मागे न घेतल्यास त्याचा मोठा फटका महायुतीच्या उमेदवारांना बसू शकतो. त्यामूळे पालघर मधील बंडखोरीमुळे महायुतीच्या नेत्यांची डोकेदुखी वाढली आहे.