निलेश बंगाले
विधानसभा निवडणुकीत अनेक ठिकाणी उमेदवारांचे तिकीट कापली गेली आहेत. त्यामुळे ते नाराज झाले आहे. त्यातून त्यांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्जही दाखल केले आहेत. अशा बंडखोरांना थंड करण्यासाठी सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे. मात्र भाजपच्या एका बंडखोराने तर थेट अहमदाबाद गाठत अमित शहांचीच भेट घेतली आहे. या भेटीनंतर भाजपने मोठा निर्णय घेतला आहे. या भेटीची सध्या राजकीय वर्तूळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
वर्धा जिल्ह्यातील आर्वी विधानसभा मतदार संघात दादाराव केचे हे विद्यमान आमदार आहेत. मात्र त्यांची उमेदवारी भाजपने कापली. त्यांच्या ऐवजी सुमित वानखेडे यांना उमेदवारी जाहीर केली. वानखेडे हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अत्यंत जवळचे समजले जातात. आधी पासूनच त्यांना उमेदवारी मिळणार याची कुणकुण दादाराव केचे यांना लागली होती. त्यामुळे त्यांनी मुंबई वारी करत फडणवीसांचीही भेट घेतली होती. पण त्यांच्या प्रयत्नांना काही यश आलं नाही.
ट्रेंडिंग बातमी - 'ज्यांना गद्दार म्हटलं जातं ते मुख्यमंत्री होतात' भाजपचा नेता हे काय बोलला?
भाजपच्या पहिल्या यादीत त्यांना स्थान मिळाले नाही. बहुतांश विद्यमान आमदारांना उमेदवारी देण्यात आली. पण त्यात दादाराव केचे यांचे नाव नव्हते. पुढच्या यादीत ही केचेंची उमेदवारी कापण्यात आली. त्यामुळे नाराज झालेल्या दादाराव केचे यांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. केचे यांच्या उमेदवारी मुळे आर्वीची भाजपची जागा धोक्यात आल्याची चर्चा होती. शिवाय केचे यांनी काही झालं तरी निवडणूक लढणारच असे जाहीर केले होते. अशा वेळी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मध्यस्थी केली.
ट्रेंडिंग बातमी - मनसेची बदलती भूमिका अन् 2024 ची निवडणूक! राज ठाकरेंनी काय काय केलं?
दादाराव केचे यांनी बावनकुळेंसह थेट अहमदाबाद गाठवे. तिथे त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. या भेटीत केचे यांची समजूत काढण्यात आली. शिवाय त्यांना प्रदेश उपाध्यक्षपद ही देण्याच आले. त्यांना तातडीने मुंबईत येताच नियुक्ती पत्रही देण्यात आलं. त्यानंतर केचे यांची नाराजी दुर झाली. त्यांनी वर्धा इथे पत्रकार परिषद घेत आपण निवडणूक रिंगणातून माघार घेत असल्याचे जाहीर केले. शिवाय भाजपचे अधिकृत उमेदवार सुमित वानखेडे यांचा प्रचार करणार असल्याचे स्पष्ट केले.
ट्रेंडिंग बातमी - दादांची आबांवर टीका, शरद पवार पहिल्यांदाच बोलले, अजित पवारांना थेट सुनावले
दादाराव केचे यांनी उमेदवारी मागे घेण्याची घोषणा केल्यामुळे भाजपला दिलासा मिळाला आहे. शिवाय सुमित वानखेडे यांनी ही सुटकेचा निश्वास सोडला आहे. सुमित वानखेडे यांची लढत राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या उमेदवार मयुरा काळे यांच्या बरोबर होणार आहे. वर्ध्याचे खासदार अमर काळे यांच्या त्या पत्नी आहेत. त्यामुळे वानखेडे यांच्या समोर तगडे आव्हान आहे. अशा वेळी केचे यांनी उमेदवारी मागे घेतल्याने त्यांना दिलासा मिळाला आहे. शिवाय केचे यांना मानणारा वर्गही वानखेडे यांच्या मागे उभा राहाणार आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world