- विधान परिषदेच्या ११ जागांवर महायुतीने विजय मिळवला आहे
- हिंगोली परभणी स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघात महायुतीच्या सईद खान यांना विधान परिषदेत निवडून दिले गेले
- महायुतीकडे ३३४ मतं असूनही सईद खान यांना २४२ मतं मिळाली असून मतं फुटल्याचे स्पष्ट झाले आहे
नजीर खान
विधान परिषदेच्या 11 जागांसाठी मतदान झालं होतं. त्याचा निकाल आज जाहीर करण्यात आला. अपेक्षे प्रमाणे महायुतीने जोरदार मुसंडी मारत सर्वच जागांवर विजय मिळवला आहे. पण राज्याचे लक्ष एका महत्वाच्या जागेकडे लागले होते. ती जागा म्हणजे हिंगोली परभणी स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघाच्या निकालाकडे. त्याला कारण ही तसेच होते. कट्टर हिंदूत्वाचा पुरस्कार करणाऱ्या शिवसेना भाजप महायुतीने या ठिकाणी सईद खान यांना उमेदवारी दिली होती. त्यामुळे सर्वांच्यात भूवया उंचवल्या होत्या. त्यामुळे इथं निकाल काय लागणार याकडे लक्ष लागलं होतं. शेवटी इथं महायुती सईद खान यांना विधान परिषदेत पाठवण्यात यशस्वी झाली आहे. पण एका गोष्टीने किरकिरी झाली आहे.
परभणी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत शिवसेना भाजप युतीचे उमेदवार सईद खान यांचा सहज विजय होणार हे आधी पासूनच निश्चित होतं. महायुतीकडे जवळपास 334 मतं होतं. मात्र ही सर्व मतं खान यांना मिळणार का याकडेच सर्वांचे लक्ष लागले होते. 465 पैकी 334 मतं ही महायुतीची होती. प्रत्यक्षात खान यांनी 242 मतं मिळवत विजय मिळवला. असं असलं तरी महायुतीची 92 मतं फुटल्याचं समोर आलं आहे. हा महायुतीसाठी मोठा धक्का मानला जात आहे. विजय मिळवला असला तरी मतं फुटी मुळे शिंदेंची किरकीरी मात्र निश्चितच वाढली आहे.
या निवडणुकीत शिवसेना ठाकरे गटाचे डॉ. विवेक नावंदकर हे महायुतीचे उमेदवार म्हणून रिंगणात होते. त्यांना169 मते मिळाली. तर अपक्ष सुशिल देशमुख यांना 56 मिळाली आहे. त्यामुळे इथं काही प्रमाणात मविआने टक्कर देण्याचा प्रयत्न केला आहे. विजय मिळाला असला तरी महायुतीत काही जणांनी गद्दारी केल्याचा आरोप विजयी उमेदवार सईद खान यांनी केला आहे. सईद खान यांनी आपल्या प्रतिक्रियेमध्ये राष्ट्रवादीचे आमदार राजेश विटेकर आणि राष्ट्रीय समाज पक्षाचे आमदार रत्नाकर गुट्टे यांच्या नावाचा उल्लेख केला नाही. उलट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या स्तरावर हे प्रकरण बघितले जाईल असे सूचक विधान केलं आहे.
या विजयामुळे एकनाथ शिंदे ही लक्ष होताना दिसत आहे. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून परभणीत मुस्लीम महापौर करण्यात आला होता. शिवाय ठाकरे गटाचे एक खान आमदार ही आहेत. यावरून शिंदे सेनेनं ठाकरेंना लक्ष केलं होतं. बाण नाही तर खान अशी टिका झाली होती. शिवाय हिंदूत्व सोडलं अशी टोकाची टिका ही शिंदे सेनेनं केली होती. त्याच शिंदे सेनेनं आता सईद खान यांना विधान परिषदेत पाठवलं आहे. त्यामुळे त्यावर ठाकरेंच्या सेनेकडून काय प्रतिक्रीया येते हे पाहावे लागेल.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world