PM Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एनडीटीव्ही समूहाशी एक्स्लुझिव्ह बातचित केली. बिहारमधील रोड शोदरम्यान एनडीटीव्हीच्या प्रतिनिधी मायरा यांनी पंतप्रधान मोदी यांच्याशी संवाद साधला. भाजप आणि एनडीए देशात जनतेच्या पाठिंब्याने 400 पार जागा जिंकणार, असा दावा देखील पंतप्रधान मोदी यांनी केला.
(नक्की वाचा: PM नरेंद्र मोदी निवृत्त होणार? अरविंद केजरीवालांनी असं वक्तव्य करुन काय साधलं?)
काय म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी?
देशातील सर्व राज्यांत मी फिरलो. सर्वच ठिकाणी भाजप आणि एनडीएला 400 पार करण्याच्या संकल्प जनतेने केला आहे. बिहारमध्येही भाजपला मोठी ताकद मिळाली आहे. देशातील जे वातावरण तेच वातावरण बिहारमध्ये दिसत आहेत. बिहारमध्ये मागील वेळी आम्ही एक जागेवर हरलो होतो. मात्र आता आम्ही सर्वच जागांवर विजय मिळवू असा अंदाज आहे, असे पंतप्रधान मोदी यांनी म्हटले.
(नक्की वाचा -'मोदी गॅरंटी'ला 'केजरीवाल गॅरंटी'चं आव्हान; अरविंद केजरीवाल यांची 10 मोठी आश्वासने)
भारताचा विकास करायचा असले तर पूर्व भारताचा विकास करण्याची गरज आहे, हे मी पंतप्रधान नव्हतो तेव्हाही म्हटले होते. पूर्व भारताला ग्रोथ इंजिन बनवले पाहिजे. मागील 10 वर्षात मी सतत पूर्व भारतात पायाभूत सुविधा, शिक्षण, आरोग्य इत्यादी प्रत्येक क्षेत्रामध्ये भरपूर काम केले आहे. त्यामुळे पूर्व भारतात आधीच्या तुलनेत भाजपला जास्त यश मिळेल. आश्चर्यचकित करणारा हा निकाल असेल, असा दावाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला.
भाजपने देशाला एक गर्व्हनन्स मॉडेल दिले आहे. देशाने काँग्रेस मॉडेल, लेफ्ट मॉडेल, आघाडी सरकार मॉडेल पाहिले. तसेच भाजपचे वेगवान, धाडसी निर्णय घेणारे सरकार देखील पाहिले आहे. या मॉडेलच्या आधारे आम्ही पुढे जात आहोत, असे पंतप्रधान नरेंद्र यांनी म्हटले.