Exclusive : 73 व्या वर्षी 22 वर्षांच्या तरुणासारखा उत्साह कसा? PM मोदींनी सांगितलं रहस्य

PM Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी NDTV नेटवर्कला दिलेल्या खास मुलाखतीमध्ये त्यांच्या एनर्जीचं रहस्य सांगितलं आहे.

Advertisement
Read Time: 2 mins
नवी दिल्ली:

लोकसभा निवडणूक 2024  (Lok Sabha Elections 2024) साठी पंतप्रधान नरेंद्र मोदी  (PM Narendra Modi) यांनी भारतीय जनता पार्टीसमोर (BJP) 370 आणि राष्ट्रीय लोकशाही आघाडीला (NDA) 400 जागांचं लक्ष्य निश्चित केलंय. भाजपाच्या निवडणूक प्रचाराची धूरा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सांभाळलीय.  पंतप्रधान मोदी रोज रात्री 3 ते 4 तास झोपतात. निवडणुकीच्या प्रचारात रोज वेगवेगळ्या राज्यात प्रवास करुन ते 3 ते 4 प्रचारसभा करत आहेत. काही ठिकाणी त्यांचे रोड शो देखील होतायत. वयाच्या 73 व्या वर्षी देखील 22 वर्षांच्या तरुणासारखी एनर्जी त्यांना कुठून मिळते? हा प्रश्न पडणं स्वाभाविक आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्वत: NDTV नेटवर्कला दिलेल्या खास मुलाखतीमध्ये या प्रश्नाचं उत्तर दिलंय.  

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी NDTV ला एक्स्क्लुझिव्ह मुलाखत दिली. यामध्ये त्यांनी निवडणुकीतील मुद्यांसह त्यांचं वैयक्तिक आयुष्य, रोजचा दिनक्रम या विषयावरच्या प्रश्नांना देखील उत्तरं दिली. राजकारणासह त्यांना अन्य कोणत्या गोष्टींमध्ये रस आहे, हे पंतप्रधानांनी या मुलाखतीमध्ये सांगितलं. वयाच्या या टप्प्यावरही 22 वर्षांच्या मुलासारखी एनर्जी कशी मिळते? यावर पंतप्रधान मोदी म्हणाले की, ' मी वयाच्या 15 वर्षांनंतच्या कालखंडात बरेच प्रयत्न केले. अनेक अडचणींमध्ये माझं आयुष्य गेलंय. सुख-सुविधांशी माझा काही संबंध नव्हता. मला जे काम देण्यात आलं ते मी कर्तव्य भावनेतून आणि काही शिकण्याच्या हेतूनं पूर्ण केलं.'

( नक्की वाचा : Exclusive : सत्ता मिळवण्यासाठी नाही, देश घडवण्यासाठी मी काम करतो : PM नरेंद्र मोदी )

आजही विद्यार्थी

पंतप्रधानांनी सांगितलं, 'तुम्ही आयुष्यभर विद्यार्थी अवस्थेत असता त्यावेळी तुमचं मन नेहमी फ्रेश राहतं. त्या काळात तुमच्यात शिकण्याची वृत्ती मिळते. शरीराच्या सर्व रचनेत मनाची अवस्था खूप मोठी असते. माझ्या परिस्थितीमध्ये माझ्यातील विद्यार्थी नेहमी जिवंत आहे. नवं काही तरी शिकण्याची आणि नवं समजून घेण्याची माझी नेहमी इच्छा असते. त्यामुळेच मी नेहमी इतका फ्रेश राहतो.'

( Exclusive : देशाच्या विकासाचे मॉडेल ते विरोधकांचे आरोप... थेट प्रश्नांना PM नरेंद्र मोदींची बेधडक उत्तरे )

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचा मुद्दा समजावून सांगण्यासाठी कॉम्पयुटर ऑपरेटर आणि सितारवादकाचं उदाहरण दिलं. मोदी म्हणाले, 'कॉम्पयुटर ऑपरेटर दिवसभर संगणकावर हात चालवतो. संध्याकाळी नोकरी करुन घरी परततो तेंव्हा तो थकलेला दिसतो. खरं तर त्याचं वय 50 देखील नसतं. दुसरिकडं सितारवादक आहेत. ते देखील त्यांच्या बोटाची कमाल दाखवतात. त्यांना 80 वर्षांनंतरही पाहिलं तर ते अगदी जिवंत असल्याचं दिसतं. ते एकदम फ्रेश दिसतात. या दोघांमध्ये मनासिक अवस्थेचा फरक आहे.'

Advertisement
'एक कॉम्प्युटर ऑपरेटर दिवसभर काम केल्यानंतर अगदी थकलेल्या अवस्थेत घरी परततो. दुसरीकडं एक सितारवादक 80 व्या वर्षी देखील तरुण दिसतो. हा बोटांचा किंवा वयाचा फरक नाही. तर मानसिक अवस्थेचा आहे.'