उत्तर मध्य मुंबईत शेलार की महाजन? भाजपाचा निर्णय झाला

जाहिरात
Read Time: 2 mins
Poonam Mahajan Ashish Shelar : उत्तर मध्य मुंबईतील भाजपाचा उमेदवार कोण? याचं उत्तर मिळालं आहे. (फोटो : @ @ShelarAshish/X)

मुंबईतील सहा लोकसभा मतदारसंघापैकी सध्या 2 जागांवर भाजपानं उमेदवार जाहीर केले आहेत. उत्तर मध्य मुंबईतील उमेदवार भाजपानं अद्याप जाहीर केलेला नाही. पूनम महाजन इथं भाजपाच्या खासदार आहेत. त्याचबरोबर मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार यांचंही नाव या मतदारसंघातून चर्चेत होतं. महाजन की शेलार? सस्पेन्स संपला आहे. स्वत: आशिष शेलार यांनीच 'NDTV मराठी' शी बोलताना याबाबत घोषणा केली आहे.

कोण असेल उमेदवार?
  
उत्तर मध्य लोकसभा मतदार संघातून पूनम महाजन उमेदवार असतील. या मतदार संघातून पूनम महाजन यांचे नाव दिल्लीला पाठवले आहे. माझे नाही त्यामुळे मी निवडणूक लढवण्याचा मुद्दा नाही. मुंबईतील उमेदवारांचे नाव तुर्तास जाहीर न करणे ही रणणिती आहे, असं शेलार यांनी सांगितलं. त्यामुळे पूनम महाजन पुन्हा एकदा या मतदारसंघातून भाजपाच्या उमेदवार असतील हे स्पष्ट झालं आहे.  

उत्तर मुंबईत ट्वीस्ट, काँग्रेसच्या गळाला तगडा उमेदवार?
 

राज ठाकरेंना रिटर्न गिफ्ट

मनसे अध्यक्ष राज ठाकरे भाजपला बिनशर्त पाठिंबा दिलाय त्यांचे आम्ही स्वागत करतो आणि त्याची भरपाई विधानसभा, महानगर पालिकेच्या निवडणुकीत केली जाईल, असंही शेलार यांनी सांगितलं. मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्यात राज ठाकरे यांनी महायुतीला बिनशर्त पाठिंबा जाहीर केला आहे. त्यावर शेलार यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. 

बिनशर्त पाठींब्यावरून 'राज'कारण तापलं, ठाकरे उत्तर देणार?
 

महाविकास आघाडीत उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला जास्त जागा मिळाल्या आहेत. पण, त्यांचा भोपाळाही फुटणार नाही असा टोला शेलार यांनी लगावला. मुंबईत काँग्रेसची अवस्था चाळण झाली, उबाठा गट  जनतेसमोर जातच नाही. राष्ट्रवादी शरदचंद्र पक्षाची मुंबईत ताकद नाही, असा दावा त्यांनी केला. 
 

Advertisement
Topics mentioned in this article