महाविकास आघाडीत जागा वाटपाबाबत एकमत झाले आहे. त्यानुसार मुंबईतला उत्तर मुंबई लोकसभा मतदार संघ काँग्रेसच्या वाट्याला गेला आहे. इथं काँग्रेस तगड्या उमेदवाराच्या शोधात आहे. इथं एक ट्वीस्ट निर्माण झाला आहे. इथं आता तेजस्वी घोसाळकर यांची एन्ट्री झाली आहे. त्यामुळे काँग्रेसला त्यांच्या रूपानं एक तगडा उमेदवार मिळण्याची आशा निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमिवर तेजस्वी यांची मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड यांनी भेट घेतली आहे. तेजस्वी यांचे पती अभिषेक घोसाळकर यांची काही महिन्या पूर्वी गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती.
तेजस्वी अभिषेक घोसाळकर निवडणूक लढण्यास इच्छुक
तेजस्वी घोसाळकर या उत्तर मुंबई लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत. मात्र हा मतदार संघ काँग्रेसच्या वाट्याला गेला आहे. तेजस्वी यांना शिवसेना ठाकरे गटाकडून निवडणूक लढवायची होती. या पार्श्वभूमिवर त्या उद्धव ठाकरे यांची भेट घेणार असल्याची सुत्रांची माहिती आहे. त्यानंतर त्या पुढचा निर्णय घेतली. दरम्यान या पार्श्वभूमिवर वर्षा गायकवाड यांनीही तेजस्वी यांची भेट घेतली होती. तेजस्वी यांनी काँग्रेसकडून निवडणूक लढवावी अशी विनंती वर्षा गायकवाड यांनी केल्याचंही समजत आहे. तसं झाल्यास काँग्रेसला एक तगडा उमेदवार मतदार संघात मिळेल.
हेही वाचा - बिनशर्त पाठींब्यावरून 'राज'कारण तापलं, ठाकरे उत्तर देणार?
कोण आहेत तेजस्वी घोसाळकर
तेजस्वी घोसाळकर या शिवसेनेच्या माजी नगरसेविका आहेत. विनोद घोसाळकर हे त्यांचे सासरे आहेत. ते माजी आमदार असून ठाकरे गटात कार्यरत आहेत. तर अभिषेक घोसाळकर हे त्यांचे पती होते. त्यांची नुकतीच गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. घोसाळकरांची दहीसर बोरीवली भागात चांगली ताकद आहे. शिवसेनेला हा मतदार संघ सुटेल या नुसार घोसाळकरांनी या मतदार संघात कामालाही सुरूवात केली होती.
हेही वाचा - एकीकडे भीषण पाणी टंचाई, तर दुसरीकडे टँकरमाफीयांची लूटालूट
पियुष गोयल यांच्या बरोबर सामना
उत्तर मुंबई लोकसभा मतदार संघातून भाजपनं पियुष गोयल यांना मैदानात उतरवलं आहे. विद्यमान खासदार गोपाळ शेट्टी यांची उमेदवारी कट करून गोयल यांना उमेदवारी देण्यात आली आहे. गोयल यांच्या सारख्या तगड्या उमेदवारा विरोधात काँग्रेसही तुल्यबळ उमेदवार शोधत आहेत. जर तेजस्वी यांनी काँग्रेसकडून लढण्याची तयारी दाखवली तर या मतदार संघात तुल्यबळ लढत होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
हेही वाचा - पालघरमध्ये चौरंगी लढत, 'या' पक्षाने दिला चौथा उमेदवार, रंगत वाढणार?
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world