विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर पुन्हा एकदा सक्रीय झाले आहेत. अकोल्यात त्यांनी वंचितच्या उमेदवारासाठी प्रचार सभा घेतली. या सभेत त्यांनी मुस्लीम मतदारांना वंचितलाच मतदान करण्याचे आवाहन केले. शिवाय काही झाले तरी ठाकरे आणि शिंदेंच्या शिवसेनेला मतदान करू नका. हे दोघेही बाबरी पाडण्याला जबाबदार आहेत. त्यामुळे त्यांना काही झालं तरी मतदान करू नका असे प्रकाश आंबेडकर म्हणाले. अकोल्याच्या मुर्तिजापूर विधानसभा मतदार संघात ते बोलत होते.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे या दोन्ही शिवसेना 32 मतदार संघात एकमेकां समोर निवडणूक लढत आहेत. या मतदारसंघात मुस्लिम मतदारांनी वंचितचा पर्याय निवडावा असे आवाहन त्यांनी केले आहे. या दोघांमुळे बाबरी पाडली गेली असंही ते म्हणाले. त्यामुळे अशा लोकांना मतदान करू नका. जातीला मतदान कराल तर माती खाल. कार्यकर्ता आणि पक्षाला मतदान केलं तर आपला उद्धार होईल असंही ते म्हणाले.
ट्रेंडिंग बातमी - 'आधी झक मारायची मग दुसऱ्याचं नाव घ्यायचं' शरद पवार मुश्रीफांवर भडकले
महाराष्ट्रातला मुस्लिम वंचितकडे वळतो की काय? ही प्रस्थापितांना भिती आहे असे प्रकाश आंबेडकर म्हणाले. नुपूर शर्मा नावाच्या महिलेने मोहम्मद पैगंबरांवर खालच्या भाषेत टिप्पणी केली होती. तेव्हा आम्ही आमदार कपिल पाटलांच्या माध्यमातून मोहम्मद पैगंबर बिल आणले होते. या प्रत्येक परिस्थितीत आम्ही मुस्लिमांसोबत होतो याची आठवणही यावेळी प्रकाश आंबेडकरांनी करून दिली.
ट्रेंडिंग बातमी - राज ठाकरे आले, फक्त 2 मिनिटं बोलले अन् माघारी फिरले; कारण काय?
त्याच बरोबर मी औरंगजेबाच्या कबरी गेले होतो. त्यामुळेच राज्यातील दंगली थांबल्या होत्या असेही ते म्हणाले. ठाकरे-शिंदेंची लढत असलेल्या 32 मतदारसंघात मुस्लिम मुल्ला, मौलवींनी वंचितला पाठींबा द्यावा असेही ते म्हणाले. जर मुस्लिमांनी वंचितला पाठिंबा दिल्यास आम्ही मोहम्मद पैगंबर बिल आणू असे ही ते म्हणाले. शिवाय मोहम्मद पैगंबराचं बिल आणण्यासाठी मुस्लिमांचा पाठींबा मागणे हा गुन्हा असेल तर तो गुन्हा मी शंभरदा करेल असेही त्यांनी सांगितले.