विधानसभा निवडणुकीचा धुरळा चांगलाच उडाला आहे. केंद्रीय नेत्यांच्या सभेने महाराष्ट्रातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. त्यामुळे महाविकास आघाडी आणि महायुतीत चुरसही वाढली आहे.आरोप- प्रत्यारोप होत आहेत. आव्हान प्रतिआव्हान दिलं जात आहेत. त्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेस नेत्यांना हिंदूह्रदय सम्राट बाळासाहेब ठाकरे असं बोलून दाखवावं असं आव्हान दिलं होतं. त्याला प्रियांका गांधी यांनी प्रतिसाद देत बाळासाहेब ठाकरे यांच्यात आणि काँग्रेसमध्ये काय साम्य आहे हेच सांगितलं आहे. शिर्डी इथे प्रियांका गांधी यांची जाहीर सभा झाली. त्यावेळी त्या बोलत होत्या.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
प्रियांका गांधी यांची महाविकास आघाडीच्या प्रचारासाठी शिर्डीत सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी प्रियांका गांधी यांनी महाराष्ट्राने देशाला दिशा दिल्याचे सांगितले. इथल्या संतांनी, समाजसुधारकांनी देशासाठी मोलाचे विचार दिले. देशाच्या स्वातंत्र्याची लढाई ही याच महाराष्ट्रातून सुरू झाली. समानतेचा विचारही याच धरतीनं दिला. यावेळी त्यांनी संत तुकारामांच्या, जे का रंजले गांजले, या त्यांच्या अभंगातील ओळीही बोलून दाखवल्या. छत्रपती शिवाजी महाराजांची ही धरती आहे. त्यांच्या पासून सर्वांनाच प्रेरणा मिळते. छत्रपती शिवाजी महाराज हे सर्वांचेच प्रेरणास्थान आहे असंही त्या म्हणाल्या.
ट्रेंडिंग बातमी - भन्नाट हिंदी , सॉलिड कविता! प्रियांका गांधींची सभा घोगरे काकींनी गाजवली
यावेळी त्यांनी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा ही आवर्जून उल्लेख केला. नरेंद्र मोदी नेहमी बाळासाहेबांचा उल्लेख करून दाखवा असं आव्हान राहुल गांधींना देत असतात. मी त्यांची बहीण आहे. मोदी जी ऐका. बाळासाहेब ठाकरेंचे नाव ऐका. त्यानंतर त्या पुढे म्हणाल्या, बाळासाहेब ठाकरे आणि आमची विचार धारा एक नव्हती. आमचे मार्ग ही वेगळे होते. पण बाळासाहेब ठाकरे आणि काँग्रेसने कधीही छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान सहन केला नाही. हे आमच्यातले साम्य आहे असं त्यांनी ठणकावून सांगितलं.
ट्रेंडिंग बातमी - 'नरेंद्र मोदींची मेमरी लॉस' राहुल गांधींचा हल्लाबोल
छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान या राज्यात होत आहे असा आरोप प्रियांका गांधी यांनी केला. छत्रपतींच्या स्मारकाचे भूमीपूजन करण्यात आले. पण पुढे त्याचे काही झाले नाही. संसदेतील शिवाजी महाराजांची प्रतिमा हटवली गेली. सिंधुदुर्गमध्ये शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला. याचा निषेध प्रियांका गांधी यांनी केला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा फक्त वापर केला जात आहे असा आरोपही त्यांनी यावेळी केला. दरम्यान जातीय जनगणना करणार की नाही हे मोदींनी स्पष्ट करावे असे आव्हान ही त्यांनी मोदी यांना दिले.