सभांचा धडाका! मोदी, राज, उद्धव ठाकरे आजचा दिवस गाजवणार

बड्या नेत्यांच्या सभाचा धडाका आज अनुभवायला भेटणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नंदूरबारमध्ये सभा घेणार आहेत. तर मनसे अध्यक्ष हे पुण्यात असतील. उद्धव ठाकरे छत्रपती संभाजीनगरमध्ये जाहीर सभा घेणार आहेत.

जाहिरात
Read Time: 3 mins
मुंबई:

लोकसभेच्या चौथ्या टप्प्यासाठीचा प्रचार अंतिम टप्प्यात आहे. त्यामुळे बड्या नेत्यांच्या सभाचा धडाका आज अनुभवायला भेटणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नंदूरबारमध्ये सभा घेणार आहेत. तर मनसे अध्यक्ष हे पुण्यात असतील. उद्धव ठाकरे छत्रपती संभाजीनगरमध्ये जाहीर सभा घेणार आहेत. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेही छत्रपती संभाजीनगरमध्ये असतील. त्याच बरोबर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, नवनीत राणा, निलम गोऱ्हे यांच्याही सभांचा धडाका असणार आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारहे बीडमध्ये असतील. 

'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

मोदी नंदूरबारमध्ये सभा घेणार 

लोकसभेच्या चौथ्या टप्प्यासाठी 13 मे ला मतदान होणार आहे. त्यासाठीचा प्रचार उद्या म्हणजे शनिवारी संपेल. त्या आधी महाराष्ट्रात दिग्गजांच्या सभांनी प्रचाराचा धुरळा उडणार आहे. एकूण 11 मतदार संघात चौथ्या टप्प्यात मतदान होणार आहे. या पार्श्वभूमिवर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नंदूरबारमध्ये सभा घेणार आहेत. या ठिकाणी भाजपने डॉ. हिना गावीत यांना पुन्हा मैदानात उतरवलं आहे. इथे त्यांच्या समोर काँग्रेसच्या गोवाल पाडवी यांनी तगडं आव्हान उभे केले आहे. त्यामुळे थेट नरेंद्र मोदींचीच सभा या ठिकाणी होत आहे. 

हेही वाचा - नरेंद्र दाभोलकर हत्याकांड प्रकरणात आज निकाल, 11 वर्षांनंतर तरी न्याय मिळणार?

पुण्याच्या मैदानात राज ठाकरे 

मनसे अध्यक्ष राज ठाकरेही आता प्रचारात सक्रीय झाले आहेत. त्यांनी मोदींना पाठींबा जाहीर केला आहे. त्यामुळे त्यांनी महायुतीसाठी पहिली सभा कोकणात घेतली. त्यानंतर ते आज ( शुक्रवारी ) पुण्यात सभा घेत आहेत. पुण्यात महायुतीचे मुरलीधर मोहळ हे भाजपचे उमेदवार मैदानात आहेत. त्यांच्या प्रचारासाठी राज सभा घेत आहेत. त्यांच्या सभेसाठी पुण्यातल्या मनसैनिकांनी जोरदार तयारी केली आहे. पुण्यात मनसेची चांगली ताकद आहे.   

हेही वाचा - ठाण्याचा गड कोण राखणार? ठाकरेंचा 'निष्ठावंत' की शिंदेंचा 'शिलेदार'

ठाकरे - शिंदे छत्रपती संभाजीनगरमध्ये 

एकीकडे मोदी आणि राज ठाकरे सभा घेत असताना छत्रपती संभाजीनगरच्या मैदानात उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे एकाच वेळी आहेत. उद्धव ठाकरे हे चंद्रकांत खैरे यांच्यासाठी जाहीर सभा घेतील. तर संदीपान भुमरे यांच्यासाठी शिंदेंच्या सभेचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळे छत्रपती संभाजीनगर मध्ये ठाकरें विरूद्ध शिंदे हा सामना रंगणार आहे. 

Advertisement

हेही वाचा - दुरावा दुर झाला? खासदार भावजय, आमदार दिराच्या भेटीला, भेटीत काय घडलं?

गडकरी फडणवीस ही मैदानात 

केंद्रीय मंत्री नितीन गडकरीही माजलगाव इथे जाहीर सभा घेतील. तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही शिवाजी आढळराव पाटील यांच्यासाठी सभा घेणार आहेत. त्यासाठी नवनीत राणा, निलम गोऱ्हे याही प्रचारात असणार आहे. तर शरद पवारही बीड दौऱ्यावर आहेत. त्यामुळे एकंदरीत आजचा दिवस हा प्रचाराचा धुरळा उडवून देणारा ठरणार आहे. त्यामुळे चौथ्या टप्प्यातही आरोप प्रत्यारोपांची जुगलबंदी रंगणार आहे. 

Advertisement