Pune News: पुण्यात मोठी कारवाई! मतदारांना प्रलोभन देण्याचा अनोखा प्रयत्न, 19 वॉशिंग मशीन-चांदीची भांडी जप्त

Pune News: महानगरपालिका निवडणुकीच्या मतदान प्रक्रियेसाठी अवघे काही तास उरलेले असताना निवडणूक प्रशासनाच्या भरारी पथकाने पुण्यात मोठी कारवाई केलीय.

जाहिरात
Read Time: 2 mins
"Pune News: निवडणूक प्रशासनाच्या भरारी पथकाची मोठी कारवाई"
NDTV Marathi
वाचा
Summary is AI-generated, newsroom-reviewed
  • पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणुकीत मतदारांना वॉशिंग मशीन वाटप केल्याची तक्रार
  • रहाटणी परिसरातील गणराज कॉलनीमध्ये मतदारांना वॉशिंग मशीन वाटप केल्याची माहिती
  • तब्बल 19 वॉशिंग मशीन जप्त करण्यात आल्या आहेत
आमच्या एआय सारांशामुळे मदत मिळाली?
आम्हाला नक्की कळवा.

- राहुल कुलकर्णी, प्रतिनिधी

Pune News: महानगरपालिका निवडणुकीच्या मतदान प्रक्रियेसाठी अवघे काही तास उरलेले असताना आणि प्रचारावर बंदी असतानाही मतदारांना वेगवेगळ्या पद्धतीने प्रलोभन दाखवले जात असल्याचे प्रकार उघडकीस येत आहेत. पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरात निवडणुकीच्या काळात मतदारांना वॉशिंग मशीन तसेच चांदीची भांडी वाटली जात असल्याची माहिती समोर आलीय.  

नेमकं काय आहे प्रकरण?

पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणुकीदरम्यान मतदारांना वॉशिंग मशीन वाटप केले जात असल्याची तक्रार मिळाल्यानंतर निवडणूक प्रशासनाच्या भरारी पथकाने कारवाई करत तब्बल 19 वॉशिंग मशीन जप्त केल्या आहेत.

कोणत्या भागात करण्यात आली कारवाई? 

रहाटणी परिसरातील गणराज कॉलनी येथे मतदारांना वॉशिंग मशीनच वाटप केले जात असल्याची तक्रार मिळाली होती. या तक्रारीच्या आधारे निवडणूक प्रशासनाचे भरारी पथक तत्काळ घटनास्थळी दाखल झाले आणि 19 वॉशिंग मशीन जप्त केल्या. या प्रकरणी काळेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

AKIVA कंपनीच्या 19 नव्या वॉशिंग मशीन जप्त, किंमत 1 लाख 29 हजार रुपये

निवडणूक प्रशासनाच्या भरारी पथकाने केलेल्या कारवाईत AKIVA कंपनीच्या 19 नव्या वॉशिंग मशीन जप्त करण्यात आल्या आहेत. रहाटणी परिसरात मतदारांना वॉशिंग मशीनचं वाटप केले जात असल्याची माहिती मिळाल्यानंतर भरारी पथकाने छापेमारी केली. तपासादरम्यान एक वाहन संशयास्पदरीत्या आढळून आले. या वाहनाची झडती घेतली असता त्यामध्ये AKIVA कंपनीच्या 19 नव्या वॉशिंग मशीन आढळून आल्या.

Advertisement

वॉशिंग मशीनची संख्या?

एकूण जप्त वॉशिंग मशीन : 19 

जप्त केलेल्या मशीनची किंमत किती?

जप्त मालाची एकूण किंमत : 1 लाख 29 हजार 200 रुपये (प्रत्येक मशीन अंदाजे 6 हजार 800 रुपयांच्या आसपास)

कोणत्या कंपनीचे वॉशिंग मशीन जप्त

जप्त केलेल्या सर्व वॉशिंग मशीन AKIVA कंपनीच्या असल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे. एका खासगी वाहनातून वॉशिंग मशीन नेल्या जात होत्या, MH14 KA 6330 असा त्या वाहनांचा क्रमांक आहे. वाहनासह सर्व मशीन ताब्यात घेण्यात आल्या आहेत. इतक्या मशीन कोणाच्या सांगण्यावरून आणि कोणासाठी नेण्यात येत होत्या, याचा तपास सुरू आहे.

Advertisement

(नक्की वाचा: Raj Thackeray: मतदानाच्या एक दिवस आधी राज ठाकरेंचा घणाघात, निवडणूक आयोगावर 2 गंभीर आरोप)

निवडणूक काळात मतदारांना प्रलोभन देण्याचा गंभीर प्रकार

मतदानासाठी अवघे काही तास उरलेले असताना आणि प्रचारावर बंदी असतानाही मतदारांना आकर्षित करण्यासाठी महागड्या वस्तू वाटप केल्याचा हा प्रकार अत्यंत गंभीर मानला जातोय. निवडणूक आयोगाच्या नियमांचे उल्लंघन झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष असून संबंधितांवर कठोर कारवाई होण्याची शक्यता आहे. दरम्यान मतदारांना प्रलोभन देण्याच्या तक्रारीमध्ये वाढ होत असल्याने प्रशासन अलर्ट मोडवर आहे.