Pune News:नियतीचा न्याय! लेकाने बापाच्या पराभवाचा बदला तब्बल 47 वर्षांनी घेतला, हिशोब पूर्ण

1979 साली वानवडी प्रभागातून बाळासाहेब शिवरकर विरुद्ध वामनराव जगताप अशी लढत झाली होती.

जाहिरात
Read Time: 2 mins
वाचा
Summary is AI-generated, newsroom-reviewed
  • पुणे महापालिका निवडणुकीत भाजपने एकहाती सत्ता मिळवून राष्ट्रवादी आणि काँग्रेसला मागे टाकले आहे
  • प्रशांत जगताप यांनी काँग्रेसच्या तिकिटावर वानवडी प्रभागातून अभिजीत शिवरकर यांचा दणदणीत पराभव केला आहे
  • प्रशांत जगताप यांनी निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि विजयी झाले आहेत
आमच्या एआय सारांशामुळे मदत मिळाली?
आम्हाला नक्की कळवा.
पुणे:

पुणे महापालिकेची नुकतीच निवडणूक झाली. या निवडणुकीचा निकाल ही लागला. पुण्यात भाजपने एकहाती सत्ता मिळवली. एककडे राष्ट्रवादी काँग्रेसला भाजपने धोबीपछाड दिली. तर दुसरीकडे काँग्रेस शिवसेना या पक्षांना ही मागे टाकले. काही धक्कादायक निकाल ही पुण्यात लागले. जेष्ठ नगरसेवक आणि बड्या नेत्यांना पराभवाचा धक्का बसला. त्याचीच चर्चा सुरू असताना असा एक निकाल ज्याने 47 वर्षां पुर्वीच्या आठवणी ताज्या केल्या. या आठवणी म्हणजे वडीलांच्या परभवाचा बदला लेकाने घेतला. तो ही व्याजासह. त्यामुळे हा विजय या नेत्यासाठी खासच म्हणावा लागेल. 

या नेत्याचे नाव आहे प्रशांत जगताप. प्रशांत जगताप यांनी ऐन निवडणुकीच्या तोंडावर शरद पवारांच्या राष्ट्रवादीला रामराम करत काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. काँग्रेसनं ही जगताप यांना वानवडीतून उमेदवारी दिली होती. जगताप यांची ताकद पाहाता त्यांचा विजय निश्चित मनला जात होता.पण त्यांच्या समोर माजी मंत्री बाळासाहेब शिवरकर यांचा मुलगा अभिजीत शिवरकर यांचे आव्हान होते. अभिजीत यांनी ऐन निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसचा हात सोडला होता. त्यांनी भाजपचे कमळ हाती धरले होते. त्यानंतर त्यांना उमेदवारी ही देण्यात आली. त्यामुळे वानवडीच्या प्रभाक क्रमांक 18 ड मध्ये रोमांकच लढत रंगली.

नक्की वाचा - Pune Winner Candidate List: पुणे महापालिका निवडणुकीत विजयी झालेल्या उमेदवारांची संपूर्ण यादी पाहा एका क्लिकवर

या लढतीला पुर्वीच्या काही हिशोबांचीही किनार होती. 1979 साली वानवडी प्रभागातून बाळासाहेब शिवरकर विरुद्ध वामनराव जगताप अशी लढत झाली होती. काँग्रेसच्या "पंजा" या चिन्हावर लढत बाळासाहेब शिवरकर यांनी वामनराव जगताप यांचा पराभव केला होता. आज 2026 साली 47 वर्षांनी वामनराव जगताप यांचे नातू प्रशांत जगताप यांनी हा जुना हिशोब चुकता केला आहे. त्यांनी काँग्रेसच्याच "पंजा" या चिन्हावर बाळासाहेब शिवरकर यांच्या मुलगा अभिजीत याचा दणदणीत पराभव केला आहे. तब्बल 47 वर्षांनी नियतीचा न्याय पूर्ण झाला अशी प्रतिक्रीया प्रशांत जगताप यांनी दिली आहे. अभिजीत शिवरकर हे माजी राज्यमंत्री बाळासाहेब शिवरकर यांचे पुत्र आहेत. 

नक्की वाचा - Who Will Be Pune's Next Mayor?: पुण्याचा महापौर कोण होणार? 3 नावे आहेत चर्चेत

अजित पवार आणि शरद पवार यांची राष्ट्रवादी पुण्यात एकत्र निवडणूक लढणार हे समजल्यानंतर प्रशांत जगताप यांनी आपली वाट वळवली होती. त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यामुळे प्रशांत जगताप यांना हरवण्यासाठी अजित पवारांनी जोर लावला होता. पण त्याचा काही एक उपयोग झाला नाही. मतमोजणीच्या सुरूवातीच्या राऊंडमध्ये प्रशांत जगताप हे पिछाडीवर पडले होते. पण त्यानंतर त्यांनी आघाडी घेत विजयाची नोंद केली. पुण्यात 123 जागा जिंकत भाजपने मुसंडी मारली आहे. तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीला 21 जागांवर समाधान मानावे लागले. काँग्रेस 16 जागा जिंकत तिसरा क्रमांक पटकावला आहे.  

Advertisement