ट्रम्पेट चिन्हाने पुन्हा दिला धोका, शरद पवार गटाच्या राहुल मोटे यांचं विजयाचं गणित फिस्कटलं

राज्यात महायुतीची लाट असताना सुद्धा धाराशिव लोकसभा मतदारसंघात तीन जागा राखण्यात महाविकास आघाडीला यश आले आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
धाराशिव:

अर्जुन गोडगे, प्रतिनिधी

राज्यात महायुतीची लाट असताना सुद्धा धाराशिव लोकसभा मतदारसंघात तीन जागा राखण्यात महाविकास आघाडीला यश आले आहे. राज्यात विरोधी लाट असताना सुद्धा मायबाप जनतेने टाकलेला विश्वास आम्ही सार्थ ठरवू, कायमस्वरूपी जनतेची सेवा करू असे म्हणत खासदार ओमराजे निंबाळकर यांनी धाराशिवमध्ये आनंदोत्सव साजरा करून जनतेचे आभार मानले आहेत. फटाक्याची आतिषबाजी गुलालाची उधळण करत धाराशिवमध्ये आनंद उत्सव साजरा केला आहे. महायुतीने जनतेला दिलेली आश्वासने पूर्ण करावीत असा टोलाही त्यांनी लगावला आहे.

Advertisement

नक्की वाचा - Sanjay Pugalia Analysis: निवडणूक हरणं कुणी राहुल गांधींकडून शिकावं, भाजपा, संघही मानेल गांधींचे आभार

दरम्यान शरद पवार गटाला ट्रम्पेट चिन्हामुळे मोठा धक्का बसला आहे. ट्रम्पेट चिन्हामुळे राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या राहुल मोटे यांचं विजयाचे गणित फिसकटलं आहे. धाराशिव जिल्ह्यातील परांडा विधानसभा मतदारसंघातून शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे उमेदवार डॉक्टर तानाजी सावंत 1509 मतांनी विजयी झाले आहे. त्यांच्या विरोधात शरद पवार गटाचे राहुल मोटे यांनी तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हावर निवडणूक लढवली होती. तुतारीसारखे चिन्ह दिसणारा ट्रम्पेटचा उमेदवार जमीलखा पठाण यांना 4446 मते मिळवली आहेत. राहुल मोटे यांचा 1509 मताने पराभव झाला आहे. त्यामुळे राहुल मोटे यांचा पराभव ट्रम्पेट या चिन्हामुळेच झाला असल्यास बोलले जात आहे.

Advertisement

नक्की वाचा - ​​​​​​​बीड जिल्ह्यातील सहापैकी 5 जागांवर महायुतीचा झेंडा! धनंंजय मुंडेंचा रेकॉर्डब्रेक विजय

धाराशिव लोकसभा मतदारसंघातील मविआचे विजयी उमेदवार

उस्मानाबाद - कैलास पाटील - उबाठा

उमरगा - प्रवीण स्वामी - उबाठा

बार्शी - दिलीप सोपल - उबाठा