रमेश वांजळेंच्या लेकासाठी राज ठाकरे मैदानात, जुन्या आठवणी सांगत म्हणाले...

मयुरेश वांजळे आता निवडणुकीच्या रिंगणात आहे. ते ही मनसेच्या तिकीटावर खडकवासला मतदार संघातून निवडणूक लढत आहेत. त्यांच्या प्रचाराला राज ठाकरे पुण्यात आले होते.

जाहिरात
Read Time: 3 mins
पुणे:

रमेश वांजळे हे मनसेचे पहिले आमदार होते. ते खडकवासला मतदार संघातून मनसेच्या तिकीटावर विजयी झाले होते. मात्र त्यांची आमदारकीची टर्म पुर्ण होण्या आधीच त्यांचे निधन झाले. त्यांचाच मुलगा मयुरेश वांजळे आता निवडणुकीच्या रिंगणात आहे. ते ही मनसेच्या तिकीटावर खडकवासला मतदार संघातून निवडणूक लढत आहेत. त्यांच्या प्रचाराला राज ठाकरे पुण्यात आले होते. यावेळी बोलताना ते रमेश वांजळे यांच्या आठवणीत रमले. मुयरेशला मतदान कराल तेव्हा तुम्हाला वाटेल आपण रमेश वांजळेंनाच मतदान केलं आहे असंही ते यावेळी म्हणाले. 

( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

भाषणाच्या सुरूवातीला राज म्हणाले की मयुरेशला पहिल्यांदा पाहील्यानंतर तो माझ्या पुतण्या सारखा वाटला. त्यानंतर समजलं की तो आपल्या रमेश वांजळेंचा मुलगा आहे. म्हणजे तो ही माझा पुतण्याच झाला असं राज म्हणाले. त्यानंतर राज ठाकरे रमेश वांजळेंच्या आठवणीत रमले. ते म्हणाले तो दिवस अजूनही आठवतोय. आमचा रमेश शेवटचं जर कोणाशी बोलला असेल तर तो माझ्याशी बोलला होता. मी फोन लावला. त्यावेळी त्यांनी सांगितलं मी हॉस्पिटलला आलोय. एमआरआय काढायला. तो काढल्या नंतर मी लगेचच फोन करतो. ती त्याला सांगितलं होतं मला बोलायचं आहे. मात्र पंधरा मिनिटांनी फोन आला रमेश गेला. एमआरआय काढताना गेला. काय बोलावं हे त्यावेळी समजलं नाही. 

ट्रेंडिंग बातमी - 'उद्धवजी तुम्हाला बाळासाहेबांनी हेच शिकवलं का?' आठवलेंचा ठाकरेंना सवाल काय?

मनसेच्या स्थापनेनंतर  अनेक जण मला सोडून गेले. पण आज रमेश असता तर तो माझ्या बरोबर असता असंही राज आवर्जून म्हणाले. ते गळ्यात सोन्याचे दागिने घालत होते. त्यावेळी मी त्याला  येवढ्या वजनाचं गळ्यातून काढ असं सांगायचो. तो माझ्या समोर कधीच ते घालायचा नाही. बाहेर जाताना घालायचा अशी आठवणही त्यांनी सांगितली. आज मुयरेश रमेशची आठवण करून देतो. तो आकारानेही तसाच आहे. शिवाय सोन्याने मढलेलाही तसाच आहे. पण गोड पोरगा आहे. प्रामाणिक मुलगा आहे. त्यामुळे त्याला नक्की मतदान करा असं आवाहन त्यांनी यावेळी केले.

ट्रेंडिंग बातमी - Vote Jihad ला व्होट धर्मयुद्धानं उत्तर द्या, PM मोदींच्या उपस्थितीमध्ये फडणवीसांचं आवाहन

यावेळी त्यांनी शरद पवारांवर जोरदार हल्लाबोल केला. शरद पवारंनी जातीपातीत भांडण लावली. जाती जातीत लोक राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेनंतर विभागली गेली. त्यांच्या भांडणं लावली गेली. त्या मागे शरद पवार होते असा आरोपही त्यांनी केला. शरद पवारांनी फक्त बारामतीचा विकास केला. त्यांनी महाराष्ट्रासाठी काही केलं नाही. मग त्यांना राज्याचे नेते का म्हणायचं. त्यांनी तालुक्याचा विकास केला मग ते तालुक्याचे नेते असंही राज म्हणाले. 

Advertisement

ट्रेंडिंग बातमी - 'आयुष्यात कधी संविधान वाचलं नाही', राहुल गांधींचा PM मोदींना टोला

मला महाराष्ट्राला गतवैभव मिळवून द्यायचं आहे. त्यासाठी सर्व सत्ता माझ्या हातात द्या. सर्व गोष्टी होवू शकतात. मिळू शकतात. पण त्यासाठी राज ठाकरे हवा असंही ते म्हणाले. शिवाय मनसेचा जाहीरनामा उद्या शुक्रवारी प्रकाशित होणार आहे. हा असा जाहीरनामा आहे ज्यात प्रश्ना बरोबर त्याची उत्तरही देण्यात आली आहेत. म्हणून मी तुमच्याकडे सत्ता मागत आहेत. पहिल्या पाच वर्षात प्रश्न सुटतील असं नाही. पण त्या प्रश्नांना हात घातला आहे हे तुम्हाला नक्की समजेल असंही राज यावेळी म्हणाले.