महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा मुंबईतील शिवाजी पार्कमध्ये झाली. या सभेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्होट जिहादचा मुद्दा उपस्थित केला. व्होट जिहाद करत असेल तर व्होटाचं धर्मयुद्ध करण्याची करण्याची वेळ आली, आहे, असं फडणवीस यांनी सांगितलं.
काय म्हणाले फडणवीस?
उलेमा बोर्डाच्या 17 मागण्या काँग्रेसनं मान्य केल्या, असं वृत्त मध्यंतरी प्रसिद्ध झालं होतं. त्या विषयावर बोलताना फडणवीसांनी काँग्रेसला या मागण्या तुम्ही वाचल्या होत्या का? हा प्रश्न विचारला. उलेमांच्या 17 मागण्या मान्य करताना तुम्ही त्या वाचल्या होत्या का? त्यामधील एक मागणी त्यांनी मान्य केलीय. त्यामध्ये 2012 ते 2024 या काळात महाराष्ट्रात ज्या दंगली झाल्या त्या दंगलीतील मुसलमान आरोपींना सोडून द्या अशी मागणी उलेमांनी केली. ती मागणी मान्य केली आहे, असा दावा फडणवीस यांनी केला.
देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या भाषणात महायुतीच्या काळात मुंबईची वाहतूक सुरळीत करण्यासाठी केलेल्या सुविधा सांगितल्या. BDD चाळीचा पुर्नविकास, धारावीचं पुनर्विकास, अशा 100 गोष्टी मी सांगू शकतो, असं त्यांनी स्पष्ट केलं.
( नक्की वाचा : Exclusive : देवेंद्र फडणवीसांनी स्वच्छ कारभार केला, थेट शरद पवारांनीच दिलं प्रशस्तीपत्रक Video )
पुढच्या 5-7 वर्षांमध्ये माझा धारावीचा माणूस धारावीमध्येच पक्क्या, चांगल्या सुंदर घरात बसलेला आपल्याला पाहायला मिळेल. मोदींच्या प्रेरणेतून आपण 18 निर्णय घेतले. 1600 प्रकल्प येत आहेत. रिडेव्हलपमेंटच्या माध्यमातून 100 स्क्वेअर फुटांच्या घरात राहणाऱ्या माणसाला 500 स्क्वेअर फुटांचं घर मिळणार आहे असंही देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world