राज ठाकरेंचा आदित्य विरोधातील उमेदवार ठरला! संदीप देशपांडेंचं कौतुक करताना म्हणाले...

Raj Thackeray : राज ठाकरेंनी केलेल्या भाषणातून वरळी विधानसभा मतदारसंघात मनसेचा उमेदवार कोण असेल? याचे स्पष्ट संकेत दिले आहेत.

Advertisement
Read Time: 2 mins
मुंबई:


लोकसभा निवडणुकीत महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं विधानसभा निवडणुकांची तयारी सुरु केली आहे. आगामी विधानसभा निवडणूक स्वबळावर लढण्याची घोषणा मनसेनं केली आहे. मुंबई महानगरातील मराठी बहुल मतदारसंघात चांगली कामगिरी करण्यासाठी मनसेनं तयारी सुरु केली आहे. याच तयारीचा भाग म्हणून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी त्यांचे पुतणे आदित्य ठाकरे आमदार असलेल्या वरळी मतदारसंघाचा दौरा केला. यावेळी राज ठाकरेंनी केलेल्या भाषणातून वरळीमध्ये मनसेचा उमेदवार कोण असेल? याचे स्पष्ट संकेत दिले आहेत.

( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

मनसे नेते संदीप देशपांडे यांनी आयोजित केलेल्या 'व्हिजन वरळी' या कार्यक्रमात बोलताना राज यांनी संदीप देशपांडे यांचं जोरदार कौतुक केलं. संदीप राजकीय दृष्या, आपल्या भागाबद्दल अत्यंत जागृत मुलगा आहे. विषयावर बोलणारा आहे. काम होणार असेल तर हो म्हणून सांगतो, होणार नसेल तर नाही म्हणून सांगतो. 

 आज त्याने वरळी व्हिजन ठेवलं आहे. पण उद्या जेव्हा बाहेरून लोक येऊन वरळीचा मातेरं होईल तेव्हा पश्चातापाचा हात डोक्यावर मारू नका. बाकी सगळे निघून जातील कुणी हाताला लागणार नाही. पण, पण आम्ही सदैव तुमच्या सोबत आहोत. जे चांगलं काम करत आहे ते त्यांच्या पाठीवर शाबासकी पडणार आहे की नाही?' या शब्दात राज यांनी संदीप देशपांडे यांच्या कामाचा कौतुक करत त्यांच्या उमेदवारीवर एकप्रकारे शिक्कामोर्तब केलं असं मानलं जात आहे. 

( नक्की वाचा : मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीसाठी आता नवी तारीख, हायकोर्टाकडून विनंती मान्य )
 

वरळी विधानसभा मतदार संघ हा शिवसेनेचा गड समजला जातो. आदित्य ठाकरे हे या मतदार संघातून विजयी झाले आहेत. त्यांच्या दिमतीली दोन विधान परिषदेचे आमदार आहेत. ते याच मतदार संघात आहेत. शिवाय माजी महापौरही याच मतदार संघात राहातात. त्यामुळे आदित्य ठाकरेंसाठी ही सेफ जागा समजली जाते. मात्र मनसेने या मतदार संघात आदित्य ठाकरेंसमोर आव्हान उभं केलं आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीतून वरळी विधानसभेतून शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार अरविंद सावंत यांना अगदीच कमी मताधिक्य मिळाले होते. 

संदीप देशपांडे यांचा वावर या मतदार संघात वाढला आहे. त्यांनी गाठीभेटी घेणे ही सुरू केले आहे. त्यांचा 'वरळी व्हिजन' हा कार्यक्रम आणि त्यामध्ये राज यांनी केलेलं कौतुक हे पाहून आगामीन निवडणुकीत वरळीमध्ये आदित्य ठाकरे विरुद्ध संदीप देशपांडे ही लढत होईल, हे जवळपास नक्की झाले आहे