- उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची मुंबईतली पहिली संयुक्त सभा शिवाजी पार्कमध्ये झाली.
- तर ही निवडणूक मराठी माणसासाठी शेवटची असल्याचा इशारा राज यांनी यावेळी दिला
- भाषणात बुलट ट्रेन प्रकल्पावरील विरोध व्यक्त करत मुंबईला महाराष्ट्रापासून तोडण्याचा प्रयत्न असल्याचं ते म्हणाले
उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची मुंबईतली पहिली संयुक्त सभा शिवाजी पार्कवर झाली. ठाकरे बंधूंच्या या सभेकडे सर्वांचे लक्ष लागले होते. यावेळी राज ठाकरे यांनी आपल्या भाषणात मराठी मतदारांना भावनीक हाक घातली. मराठी माणसाला कशा पद्धतीने फोडले जात आहे? मुंबई महाराष्ट्रापासून कशी वेगळी केली जात आहे? त्यासाठी पडद्यामागून काय घडामोडी चालू आहेत याचा सर्व हिशोबच राज ठाकरे यांनी या सभेत मांडला. मराठी माणसासाठी ही शेवटची निवडणूक आहे समजा. आज चुकलात तर कायमचे मुकलात असं ही त्यांनी मुंबईल्या मराठी माणसांना सांगितलं. आपलेच लोक आपल्या लोकांना फोडत आहेत. पैशाच्या जिवावर काही केलं जात आहे असं ही ते म्हणाले. एकदा ही मुंबई हातून गेली तर या महाराष्ट्राचा झारखंड करायला या लोकांना वेळ लागणार नाही असं भाकीत ही त्यांनी यावेळी वर्तवलं. राज ठाकरे यांच्या भाषणा वेळी संपूर्ण शिवाजी पार्क स्तब्ध झालं होतं.
राज ठाकरेयांनी आपल्या भाषणात अनेक मुद्द्यांना हात घातला. ते म्हणाले बुलेट ट्रेनला माझा विरोध आहे काल ही होता. जिथे बुलट ट्रेनचे शेवटचे स्थानक आहे तिथे मुंबई पेक्षा दिड पट मोठं शहर वसवलं जात आहे. तिथं फॉक्सकॉन सारखी कंपनी आधीचत आली आहे. मराठी माणला नाकारण्यासाठी हा डाव आखला जात आहे. मुंबईला जास्तीत जास्त गुजरातच्या जवळ घेवून जात आहेत. जर या शहरात तुमचेच अस्तित्वच नसेल तर काय चाटायच्या आहेत या महापालिका असा संतप्त सवाल राज ठाकरे यांनी यावेळी केला. अशा या सत्तेचा काय उपयोग आहे. ज्या सत्ते मराठी माणून नाही असं ही ते यावेळी म्हणाले. मराठी माणूस मुंबईतून हद्दपार करण्याचा वेगळ्या पद्धतीने प्रयत्न केला जात आहे.
आम्ही हे शहर उत्तम शहर करू पण तुम्ही त्यात असायला पाहीजे ना असं ही ते म्हणाले. या लोकांनी तुमची काय किंमत करून ठेवली आहे. मराठी माणसा समोर पैसे फेकले की ते विकले जातात असं त्यांना वाटत आहे. ही आपली किंमत झाली आहे. शिवाय ही बोली लावणारे कोण आहेत? आपलेच लोक आहेत. आमचे लोक आमच्याच लोकांना फोडत आहेत. विकत घेत आहेत. हे सर्व पाहाता मराठी माणसासाठी ही शेवटची निवडणूक आहे. आज चुकलात तर कायमचे मुकलात हे लक्षात ठेवा असं ही राज यावेळी म्हणाले. आज जर ही शहरं हातातून गेली तर राजाने मारलं आणि पावसाने झोडपलं तर जायचं कुणाकडे अशी अवस्था मराठी माणसाठी मुंबईत होईल असं ही त्यांनी सांगितलं.
इतर पक्षाच्या लोकांना ही मला सांगायचे आहे. मराठी माणसाठी एक व्हा. मुंबईसाठी एक व्हा. महाराष्ट्र आणि मुंबईला वाचवायचे असेल तर एकत्र येणं गरजेचं असल्याचं ते म्हणाले. मराठी माणसाच्या तपश्चर्येने मुंबई महाराष्ट्राला मिळाली आहे. त्यासाठी मराठी माणसे हुतात्मे झाले आहेत. जर का मुंबई हातून गेली तर हुतात्म्यांचे पुतळे काय म्हणतील असं राज म्हणाले. ते म्हणतील आम्ही मिळवलेली मुंबई तुम्ही गमवावी. अशा स्थितीत मिळालेली सत्ता असून आम्ही काय करू असं ही ते म्हणाले. सत्ते शिवाय आम्ही लाथा मारल्या आहेत. अनेकांना अंगावर घेतले आहेत. त्यांना तुडवले ही आहे. त्यामुळे या सत्ताधाऱ्यांचा आता माज उतरवायचा आहे असा आवाहन त्यांनी यावेळी केलं.
नक्की वाचा - Kalyan News: भाजपकडून पैसे वाटप? 3 हजारांची पाकीटं घरा-घरात वाटली, सेना-भाजपात घमासान
यावेळी त्यांनी ईव्हीएमवर लक्ष ठेवा असं ही मराठी मतदारांना आणि आपल्या कार्यकर्त्यांना सांगितलं. सकाळी सर्व कार्यकर्त्यांनी मतदानाला जा. दोन्ही पक्षात आणि आमच्यात आता काही वाद नाही. आता खरी लढाई भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षांशी आहे. आपण भांडत रहावं हेच त्यांना पाहीजे. पण आपण आपल्याला पाहीजे ते केलं पाहीजे. त्यामुळे सर्वांना सतर्क राहा. बेसावध राहू नका. विशेष करून दुबार मतदारांवर लक्ष ठेवा. जर का दुबार मतदार आला तर सकाळी सात वाजता त्याला फोडून काढा असा आदेश ही त्यांनी यावेळी दिला. मुंबई आपल्या हातात राहीली पाहीजे असं त्यांनी सांगितली. मराठी माणसाच्या हातात मुंबई राहीली पाहीजे असं ही त्यांनी सांगितले. मराठी साम्राज्यासाठी एक लढा दिली गेला. आता आपल्याला मुंबई वाचवण्यासाठी लढा देणे गरजेचे आहे. आपल्याला मुंबई वाचवायची आहे. आता सगळे जण कामाला लागा असं त्यांनी शेवटी सांगितलं.