राज्यसभेच्या एका जागेसाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने निवडणूक जाहीर केली आहे. प्रफुल पटेल यांच्या राजीनाम्यानंतर ही जागा रिक्त झाली होती. राज्यसभेच्या या एका जागेसाठी 25 जून रोजी मतदान आणि मतमोजणी होणार आहे. 13 जूनला अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख असणार आहे. 28 जूनपर्यंत ही निवडणूक प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
प्रफुल पटेल यांनी शरद पवार गटाकडून मिळालेल्या राज्यसभा खासदारकीचा राजीनामा दिला होता. प्रफुल पटेल यांना राजीनामा दिल्यानंत 27 फेब्रुवारी 2024 ला ही जागा रिक्त झाली होती. 4 जुलै 2028 पर्यंत या जागेचा कार्यकाळ असणार आहे.
(नक्की वाचा- दिवाळीपूर्वी महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजणार?)
राष्ट्रवादी काँग्रेसच्या या रिक्त जागेवर पक्षाकडून आता कुणाची वर्णी लागते याकडे सर्वाचं लक्ष आहे. या जागेसाठी प्रामुख्याने तीन नावे चर्चेत आहेत. यामध्ये छगन भुजबळ, पार्थ पवार, नितीन पाटील यांच्या नावाचा समावेश आहे. त्यामुळे या तीन नेत्यांपैकी कुणाची राज्यसभेवर वर्णी लागणार की आणखी कुणाला संधी मिळणार हे पाहावं लागेल.
(नक्की वाचा - अखेर निवडणूक आयोगाकडून मतदानाची आकडेवारी जाहीर; सर्वोच्च न्यायालयाच्या दिलाशानंतर निर्णय)
कसा असेल निवडणुकीचा कार्यक्रम?
- 6 जून 2024 रोजी नोटीफिकेशन निघणार आहे.
- 13 जून 2024 रोजी अर्ज दाखल करता येणार आहे.
- 18 जून अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख असेल.
- 25 जून रोजी मतदान आणि मतमोजणी होणार आहे.