महायुतीची जाहीर सभा शिवाजी पार्क मैदानावर आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी आरपीआयचे अध्यक्ष आणि केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी जोरदार फटकेबाजी केली. बाळासाहेब ठाकरे यांनी आयुष्यभर काँग्रेसला विरोध केला. पण उद्धव ठाकरे यांनी काँग्रेसलाच जवळ केली. बाळासाहेबांनी तुम्हाला हेच शिकवलं का असा खडा सवाल रामदास आठवले यांनी केला. तुम्ही आम्हाला सोडून गेला. गेलात तर जा पण शिंदे आमच्याकडे 40 आमदार घेवून आलेत असं ते म्हणाले. आता तुमची आम्हाला गरज नाही. आता अजित पवार ही आमच्याकडे आहेत असंही त्यांनी सांगितलं.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
यावेळी भाषणाची सुरूवात आठवलेंनी आपल्या चारोळीतून केली. ते म्हणाले मै यहा आया हूं, महायुती के उमेदवारोंको चुनके देने के लिये, और मै जा रहा हूं महाविकास आघाडी का बदला लेने के लिए. आर.पी.आय. महायुती सोबत आहेत. सध्या संविधान बदलाचं बोललं जात आहे. पण संविधान कोणी बदलू शकत नाही. राहुल गांधी चुकीचं बोलत आहेत. मी त्यांना सांगतो कोणी संविधान बदलू शकत नाही. जे संविधान बदलण्याचा प्रयत्न करतील त्यांना आम्ही अद्दल घडवू. मोदींनी संविधान मजबूत केलं असंही आठवले यावेळी म्हणाले. परदेशी लोकांनी आम्हाला संविधान शिकवू नये. राहुल गांधी यांच्या हातात नेहमी संविधानाचे पुस्तक असते. पण त्यात काय आहे हे त्यांना माहित नाहीत असंही ते म्हणाले.
ट्रेंडिंग बातमी - सातारा जिल्ह्यातील अपक्ष उमेदवार कोणाचे गणित बिघडवणार?
वेळ आली तर मी देईन मी माझी जान, पण बदलू देणार नाही बाबासाहेबांचे संविधान अशी कविताही यावेळी आठवले यांनी केली. लोकसभेला महायुतीचे नुकसान झाले. हे मान्य करायला पाहीजे. पण महायुती आणि महाविकास आघाडीत मतांचा फरक जास्त नव्हता. विधानसभेला आता वातावरण पुर्ण बदललं आहे. 288 जागां पैकी आम्ही 170 ते 175 जागा जिंकू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. शिवाय मुंबईतल्या 36 पैकी 25 जागा जिंकू असंही ते म्हणाले. राज्यात एकाबाजूला शिंदे प्रचार करत आहेत. दुसऱ्या बाजूला फडणवीस, तिसऱ्या बाजूला अजितदादा आणि राहीलेल्या ठिकाणी मी फिरत आहे असे आठवले म्हणाले.
ट्रेंडिंग बातमी - 'आयुष्यात कधी संविधान वाचलं नाही', राहुल गांधींचा PM मोदींना टोला
आमचे महायुतीचं सरकार आहे लय भारी, त्यांनी जागवली आहेत वस्ती वस्तीतली नारी, ड. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज ज्यांना तारी, त्यांना कोण मारी असं त्यांनी भाषणाच्या शेवटी सांगितले. शिवाय विधानसभा निवडणुकीत महायुतीचाच विजय होईल असं सांगितलं. शिवाय जो पर्यंत या देशात आहे नरेंद्र मोदींची आंधी, तोपर्यंत मला अशीच मिळत राहाणार मंत्री होण्याची संधी असं सांगत त्यांनी महायुतीला विजयी करण्याचं आवाहन केलं.