जाहिरात

सातारा जिल्ह्यातील अपक्ष उमेदवार कोणाचे गणित बिघडवणार?

आठही मतदारसंघांत सर्व अपक्षांनी मिळून पाच-दहा हजार मते घेतली तरी प्रमुख राजकीय पक्षांच्या उमेदवारांचे गणित बिघडणार आहे.

सातारा जिल्ह्यातील अपक्ष उमेदवार कोणाचे गणित बिघडवणार?
सातारा:

विधानसभा निवडणुकीमुळे सातारा जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापले आहे. जिल्ह्यात एकूण 109 उमेदवार मैदानात उतरले आहेत. यामध्ये तब्बल 57 उमेदवार अपक्ष आहेत. यामुळे आठही मतदारसंघांत सर्व अपक्षांनी मिळून पाच-दहा हजार मते घेतली तरी प्रमुख राजकीय पक्षांच्या उमेदवारांचे गणित बिघडणार आहे. विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यातील आठही मतदारसंघात काटे की टक्कर होत आहे. त्यात 109 उमेदवार नशीब अजमावत आहेत. पण खरी लढत महाविकास आघाडी आणि महायुतीतच होणार आहे. तरीही दोन मतदारसंघांत बंडखोरांनी रंगत आणली आहे. त्यामुळे ते किती मते घेणार, यावरही प्रमुख उमेदवारांचे गणित अवलंबून आहे.

( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

जिल्ह्यातील माण आणि कोरेगाव मतदारसंघात प्रत्येकी 12 अपक्ष उमेदवार रिंगणात आहेत. कोरेगावमध्ये शिंदेसेनेचे आमदार महेश शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार शशिकांत शिंदे यांच्यात लढत होत आहे. मागील निवडणुकीत अवघ्या सहा हजार मतांच्या फरकाने महेश शिंदे यांचा विजय झाला होता. आताच्या निवडणुकीत अपक्ष किती मते घेणार यावर दोघांचाही फैसला होणार आहे. माणमध्ये मागीलवेळी भाजप आमदार जयकुमार गोरे यांचा तीन हजार मतांनी विजय झाला होता. आता त्यांच्यापुढे राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे प्रभाकर घार्गे आहेत. याठिकाणीही जोरदार लढत आहे. त्यामुळे 12 अपक्ष उमेदवार किती मते घेणार यावरच जय-पराजयाचे गणित अवलंबून असेल.

ट्रेंडिंग बातमी - 'आयुष्यात कधी संविधान वाचलं नाही', राहुल गांधींचा PM मोदींना टोला

 फलटण मतदारसंघात भाजपचे सचिन कांबळे-पाटील आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार आमदार दीपक चव्हाण यांच्यातच दुरंगी लढत होत आहे. पण 7 अपक्ष उमेदवारांमुळे येथेही कोणाला तरी दगाफटका होण्याची शक्यता नाकारता येत नाही. सातारा मतदारसंघात भाजपचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले आणि उद्धवसेनेचे उमेदवार अमित कदम यांच्यात थेट सामना आहे. अपक्ष तिघे जण असले तरी त्यांचा फारसा फरक इथे पडणार नाही. वाईत मात्र अपक्ष व शिंदेसेनेचे माजी जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम जाधव यांच्या बंडखोरीने गणिते बदलू शकतात.राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे आमदार मकरंद पाटील आणि शरद पवार गटाच्या अरुणादेवी पिसाळ यांच्यात लढत आहे. जाधव किती मते घेतात हे महत्त्वाचे आहे. 

ट्रेंडिंग बातमी - शरद पवारांनी जाहीर केली मुख्यमंत्रीपदाबाबत भूमिका, उद्धव ठाकरेंचे टेन्शन का वाढले?

कऱ्हाड दक्षिणमध्ये अपक्षाचा फारसा प्रभाव नाही. येथे काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि भाजपचे अतुल भोसले यांच्यात थेट लढत होत आहे. कऱ्हाड उत्तर मतदारसंघात दुरंगीच सामना आहे. राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे आमदार बाळासाहेब पाटील आणि भाजपचे मनोज घोरपडे पुन्हा समोरा-समोर आले आहेत. तर 8 अपक्ष मैदानात आहेत. ते किती मते घेणार यावरही विजयाचा फैसला होऊ शकतो. अपक्ष विजयाचे शिल्पकार ठरले नाहीत तरी मात्र मतदारसंघातील गणिते बिघडवणार हे मात्र निश्चित आहे. 

Listen to the latest songs, only on JioSaavn.com