लोकसभेचा निवडणुकीचा निकाल हळूहळू स्पष्ट होत आहे. महाविकास आघाडीने राज्यात मोठी मुसंडी मारली आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षफुटीनंतरही महाविकास आघाडीने मोठं यश निवडणुकीत मिळवल्याचं दिसून येत आहे. निकालानंतर रोहित पवार यांनी अजित पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. बच्चा बडा हो गया, असं म्हणत रोहित पवारांनी अजित पवारांच्या टीकेचा प्रत्युत्तर दिलं आहे.
(नक्की वाचा- उत्तर महाराष्ट्रात वारं फिरलं! महाविकास आघाडीची मोठी मुसंडी)
रोहित पवार बच्चा आहे, त्यांच्याबद्दल जास्त बोलायचं नसतं. मी त्याला उत्तरे द्यावी एवढा काय तो मोठा झालेला नाही. माझे कार्यकर्ते, प्रवक्ते उत्तर देतील, असा टोला अजित पवारांना लगावला होता. बारामतीच्या निकालानंतर रोहित पवारांनी तोच धागा धरला.
रोहित पवारांनी ट्वीट करत म्हटलं की, बच्चा बडा हो गया. काही नेत्यांना वाटतं की नवीन पिढीला नेता बनण्याची घाई झालीय. पण त्यांना सांगायचंय की, नेता बनण्याची घाई नाही तर सध्या ज्या खालच्या पातळीला राजकारण गेलं त्याचा स्तर सुधारण्याची मात्र नक्कीच घाई झालीय.
(नक्की वाचा - Lok Sabha Election Result 2024 : राज ठाकरेंची जादू चालली?; महायुतीला या मतदारसंघांमध्ये मोठा फायदा)
बारामतीत सुप्रियाताईंचा विजय हा आदरणीय पवार साहेबांच्या विचारांचा, सुप्रियाताईंच्या कष्टाचा, महाविकास आघाडीच्या सर्व पदाधिकारी व सामान्य कार्यकर्ते यांच्या त्यागाचा आणि दडपशाहीला झुगारलेल्या स्वाभिमानी सामान्य जनतेच्या प्रेमाचा आहे. या दणदणीत विजयाबद्दल सुप्रियाताईंचं मनापासून अभिनंदन, असं ट्वीट रोहित पवार यांना केलं याहे.