- सांगली महापालिका निवडणूक प्रचारात राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांमध्ये मिरज येथे पैसा वाटपावरून वादावादी
- राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार इंद्रिस नायकवडी आणि शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये संघर्ष झाला आहे
- मिरज येथील जवाहर चौक परिसरात इंद्रिस नायकवडी यांच्या घरासमोर दोन्ही गटांचे कार्यकर्ते आमने-सामने आले
शरद सातपुते
सांगली महापालिका निवडणूक प्रचारा दरम्यान जोरदार राडा झासा आहे. हा राडा दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये झालाय. मिरज येथे पैसे वाटप सुरू होते. या पैसे वाटपावरून राष्ट्रवादी अजित पवार आणि शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये वादावादीचा प्रकार घडला. यावेळी राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे आमदार इंद्रिस नायकवडी आणि शरद पवार गटाच्या उमेदवारांचे कार्यकर्ते एकमेकांवर अंगावर धावून देखील गेले. यामुळे मिरजमध्ये तणावाचे वातावरण आहे. एकीकडे पुणे पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही पवार गट एकत्र लढत असताना सांगलीमध्ये मात्र वेगळं चित्र पाहायला भेटत आहे. इथं हे दोन्ही गट एकमेकांना पाण्यात पाहात असल्याचं चित्र आहे.
राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार इंद्रिस नायकवडी यांचा मुलगा प्रभाग 20 मधून निवडणूक लढवत आहे. त्यांच्याकडुन निवडणुकीत मतदारांना पैसे वाटप करण्यात येत असल्याचा आरोप राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या उमेदवाराकडून करण्यात आला आहे. त्यानंतर मिरजेतल्या जवाहर चौक येथील आमदार इंद्रिस नायकवडी यांच्या घरासमोर दोन्ही राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आमने-सामने आल्याने वादावादीचा प्रकार घडला. पैसे वाटप करत असल्याचा आरोप शरद पवार गटाच्या उमेदवाराने केला. शिवाय आपण त्यांना हे कृत्य करताना पाहीले असल्याचा दावा ही त्यांनी केला.
नक्की वाचा - Nashik News : सलीम कुत्ता प्रकरणामुळे सुधाकर बडगुजर टार्गेट; नाशिकचे राजकारण तापले
या संपूर्ण प्रकारामुळे तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. यावेळी आमदार इंद्रिस नायकवडी देखील उपस्थित होते. तर या वादावादी दरम्यान राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या उमेदवाराने शिवीगाळ केल्याचा आरोप ही होत आहे. या घटनेनंतर पोलिसांकडून जमावाला पांगवण्यात आले. मतदार याद्यांमधले असलेले घोळ,त्यामुळे मतदार यादीतील नावे आणि स्लिप बाबत नागरिकांनी आपल्या कार्यालयाजवळ गर्दी केली होती. मात्र विरोधकांकडून या ठिकाणी येऊन नागरिकांना दमदाटी करून दहशत वाजवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आमदार इंद्रिस नायकवडी यांनी केला आहे.