शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मोठं वक्तव्य करताना इंडिया आघाडी सरकार स्थापन करू शकते. आमच्याकडे आकडे आहेत. असे वक्तव्य केले आहे. शिवाय भाजप तिसऱ्यांदा सत्ता स्थापन करू शकत नाही. त्यांना सध्या चंद्राबाबू नायडू आणि नितीश कुमार यांची गरज आहे असेही त्यांनी सांगितले. लोकसभेचा हा निकाल म्हणजे मोदी आणि शहांचा पराभव आहे. त्यांनी तो मान्य करावा असेही ते म्हणाले. दरम्यान नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडे हे दोघेही लोकशाही बरोबर राहायचे की हुकुमशाही बरोबर राहायचे याचा योग्य निर्णय घेतील असेही ते म्हणाले.
हेही वाचा - इंडिया आघाडीचा मोठा डाव? शरद पवारांवर मोठी जबाबदारी, दिल्लीत हालचालींना वेग
नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू या दोघांवर भाजपचे सरकार आता पुर्ण अवलंबून आहे. मोदी आणि अमित शहा यांनी स्पष्ट करावे या दोघां शिवाय आम्ही सरकार बनवत आहोत असे आव्हान संजय राऊत यांनी दिले. 240 हा त्यांच्याकडचा आकडा आहे. तोही इडी, सीबीआय, इन्कमटॅक्सचा आकडा आहे. भाजप तर कधीच पराभूत झाले आहे. अशा स्थितीत भाजपला जर सरकार बनवायचे असेल तर त्यांनी बनवावे. तो त्यांचा अधिकार आहे असेही राऊत म्हणाले. आमच्याकडे ही आकडे आहेत. आम्हीही 250 पर्यंत पोहचलो आहोत असेही ते म्हणाले. अशा स्थितीत नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू यांनी ठरवायचे आहे की त्यांना कोणा बरोबर राहाचे आहेत. त्यांनीही मोदी आणि भाजप विरोधात संघर्ष केला आहे याची आठवण या निमित्ताने संजय राऊत यांनी करून दिली. त्यामुळे हे दोन्ही नेते भाजप बरोबर जाणार नाहीत असेही ते म्हणाले.
हेही वाचा - तुमच्या मतदारसंघातून कोण जिंकले, कितीचे मताधिक्य? पाहा एका क्लिकवर
भाजपचे तिसऱ्यांदा सरकार बनत नाही असे राऊत यांनी सांगितले. शिवाय मोदीं पेक्षा अमित शहांना गुजरातमध्ये जास्त लिड मिळाले असे सांगत त्यांनी मोदींवर टिका केली. राहुल गांधींनाही त्यांच्या पेक्षा जास्त मते मिळाली असेही ते म्हणाले. मोदी ब्रँड आता संपला आहे. संविधान वाचवण्यासाठी आणि हुकुमशाही मोडण्यासाठी आम्ही लढा दिला. त्यासा देशातल्या जनतेने साथ दिली असेही ते म्हणाले. इंडिया आघाडीत नेतृत्व कोण करणार याबाबत मतभेद नाहीत. राहुल गांधी तयार असतील तर ते आघाडीचे नेते होतील. त्याला कोणाचाही विरोध नसेल असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.