जाहिरात
Story ProgressBack

Satara Lok Sabha 2024 : उदयनराजे की शशिकांत शिंदे? साताऱ्यात कुणाची जादू चालणार?

महायुतीचे उदयनराजे भोसले तर दुसरीकडे महायुतीचे शशिकांत पाटील असा सामना या मतदारसंघात पाहायला मिळत आहे. साताऱ्याची हक्काची मानली जाणारी जागा राष्ट्रवादीतील

Read Time: 4 mins
Satara Lok Sabha 2024 : उदयनराजे की शशिकांत शिंदे? साताऱ्यात कुणाची जादू चालणार?

सुजित आंबेकर, सातारा 

सातारा लोकसभेची निवडणूक भाजप आणि शरद पवार यांच्यासाठी प्रतीष्ठेची बनली आहे. एकीकडे महायुतीचे उदयनराजे भोसले तर दुसरीकडे महायुतीचे शशिकांत पाटील असा सामना या मतदारसंघात पाहायला मिळत आहे. साताऱ्याची हक्काची मानली जाणारी जागा राष्ट्रवादीतील फुटीमुळे शरद पवारांच्या हातून निसटते की कायम राहते याकडे सर्वांचं लक्ष आहे.  

साताऱ्याची ही जागा शरद पवारांवरील निष्ठा म्हणून ओळखली जाते. राष्ट्रवादी काँग्रेसने 1999 पासून आपला खासदार येथून दिल्ली पाठवला. उदयनराजे भोसले यांनी 2009 ते 2019 दरम्यान खासदार म्हणून मतदारसंघाचे नेतृत्व केले. 2019 मध्ये देखील त्यांनी साताऱ्याची जागा 1.26 लाख मतांनी जिंकली. मात्र लगेचच त्यांनी पक्षाचा राजीनामा देत भाजपमध्ये प्रवेश केला. त्यानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत श्रीनिवास दादासाहेब पाटील यांच्याकडून सुमारे 87,000 मतांनी पराभव झाला. या पराभवानंतर भाजपने त्यांना राज्यसभेवर बसवले.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

श्रीनिवास पाटलांची माघार

विद्यमान खासदार श्रीनिवास पाटील यांनी प्रकृतीच्या कारणास्तव निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेतल्यानंतर, शरद पवार स्वत: या स्पर्धेत उतरतील अशी अफवा पसरली होती. परंतु त्यांनी त्याविरुद्ध निर्णय घेतला. त्याऐवजी पक्षाने शशिकांत शिंदे यांना उमेदवारी दिली. तर अजित पवार गटाच्या वाट्याला ही जागा येईल असा अंदाज वर्तवला जात होता. मात्र उदयनराजे यांनी अजित पवार गटाकडून निवडणूक लढवण्यास नकार दिल्याने भाजपच्या वाट्याला ही जागा आली. 

ओराप-प्रत्यारोप

साताऱ्यात निवडणुकीच्या सुरुवातीच्या टप्प्यातच शशिकांत शिंदे यांच्यावर विरोधकांना गंभीर आरोप केली. शशिकांत शिंदे यांच्यावर अटकेची टांगती तलवार निर्माण झाली होती. नवी मुंबई एपीएमसीमधील शौचालय घोटाळ्याच्या आरोपांवरुन विरोधकांनी शशिकांत शिंदे यांना घेरलं होतं. मात्र शरद पवारांना यामध्ये उडी घेत विरोधाकांच्या आरोपांना लगाम लावला. 

सातारा लोकसभेची उमेदवारी मिळवण्यासाठी उदयनराजे भोसले हे दिल्लीच्या तख्तासमोर नतमस्तक झाले. ही गोष्ट महाराष्ट्राला आवडलेली नाही. तर खरा रयतेचा प्रतिनिधी शशिकांत शिंदे आहेत. शशिकांत शिंदेच जनतेला न्याय देऊ शकतात, असं जितेंद्र आव्हाड यांनी प्रचारादरम्यान म्हटलं होतं. 

( नक्की वाचा : लातूरकरांच्या मतदानाचा पॅटर्न काय? श्रृंगारे की काळगे कुणाला मिळणार संधी?)

निकालाआधीच विजयाची खात्री 

निवडणुकीच्या निकालाआधीच दोन्ही उमेदवारांना विजयाची खात्री आहे. एकीकडे खासदार शशिकांत शिंदे नावाच्या पाटीचा फोटो व्हायरल झाला होता. तर अनेक कार्यकर्त्यांना देली तो फोटो स्टेटसला ठेवला होता. तर दुसरीकडे पिंपरी चिंचवडमध्ये उदयनराजे यांच्या विजयाचे बॅनर्स झळकले होते.  

मतदारसंघातील मुद्दे

हिंदुत्व हा येथे प्रमुख मुद्दा नाही, परंतु तो एक उदयोन्मुख मुद्दा आहे. विशेषत: 2023 च्या सातारा दंगलीच्या प्रकाशात, जिथे हिंदू आणि मुस्लीम समुदायांमधील तणावामुळे हिंसक संघर्ष झाला. हिंदू मतांच्या ध्रुवीकरणात ही भूमिका असू शकते. 

भाजपने विकास आघाडीवर आणि मोफत रेशन, आवास योजना, आयुष्मान भारत आणि अशा अनेक कल्याणकारी योजनांसह अनेक गोष्टी भाजप उमेदवाराला अनुकूल आहे. मराठा समाजासाठी 10 टक्के कोट्यावर स्वाक्षरी करण्याचा सरकारचा निर्णय देखील एक प्लस पॉइंट आहे.

(वाचा - Baramati Lok Sabha 2024: नणंद की भावजय? बारामतीचा गड कोणत्या पवारांकडे राहणार?)

प्रचारातील प्रमुख मुद्दे 

साताऱ्यातील पाण्याची टंचाई ही सर्वात मोठी समस्या आहे. याशिवाय सरकारच्या जलजीवन योजनेच्या अंमलबजावणीत अपयश आल्याने निराशा आहे. उन्हाळ्यात पिण्याचे पाणी उपलब्ध नसल्यामुळे लोक अनेकदा दूषित पाणी वापरतात. यामुळे वारंवार आजारपण आणि आरोग्यासाठी धोकादायक स्थिती निर्माण होते. शहरात आरोग्यसेवा पायाभूत सुविधांना आधार देत असताना, ग्रामीण भाग मागे पडतो आणि संपूर्ण मतदारसंघातून लोक त्यांच्या आरोग्य सेवेसाठी शहरात गर्दी करतात आणि शहराच्या संसाधनांवर प्रचंड दबाव वाढतो.

पायाभूत सुविधांच्या विकासाचा अभाव आणि चांगल्या नागरी सुविधा पुरविण्यात सरकारला आलेले अपयश, 13 औद्योगिक वसाहती, दोन विशेष आर्थिक क्षेत्र (SEZ)तरी येथील सर्वांगीण विकासावर लोक समाधानी नाहीत. साताऱ्यात पर्यटकांच्या सुविधा सुधारण्याकडे प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे साताऱ्याची पर्यटन क्षमता आणि स्थानिक अर्थव्यवस्थेत सुधारणा होण्यास मर्यादा आल्याचे लोकांना वाटते. 

(नक्की वाचा- Sangli Lok Sabha 2024: जिंकणार तर 'पाटील'च! पण कोणते?; सांगलीकरांचा कौल कुणाला?)

मतदानाची टक्केवारी

सातारा लोकसभा मतदारसंघाच्या 2019 च्या पोटनिवडणुकीत  67.15 टक्के मतदान झालं होतं. यंदाच्या निवडणुकीत मतदानाच्या टक्केवारीत मोठी घट पाहायला मिळाली. लोकसभा निवडणूक 2024 मध्ये साताऱ्यात 63.16 टक्के मतदानाची नोंद झाली. 

  • वाई -  60.83 टक्के
  • कोरेगाव - 67.59 टक्के
  • कराड उत्तर -65.34 टक्के
  • कराड दक्षिण - 65.65 टक्के
  • पाटण - 56.95 टक्के
  • सातारा - 62.74 टक्के

विधानसभानिहाय पक्षीय बलाबल

  • वाई-  मकरंद पाटील (राष्ट्रवादी अजित पवार गट)
  • कोरेगाव - महेश शिंदे (शिवसेना शिंदे गट)
  • कराड उत्तर -  शामराव पाटील (राष्ट्रवादी अजित पवार गट)
  • कराड दक्षिण - पृथ्वीराज चव्हाण (काँग्रेस)
  • पाटण - शंभूराज देसाई (शिवसेना)
  • सातारा - शिवेंद्रराजे भोसले (भाजप)

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Switch To Dark/Light Mode
Our Offerings: NDTV
  • मध्य प्रदेश
  • राजस्थान
  • इंडिया
  • मराठी
  • 24X7
Choose Your Destination
Previous Article
EVM तलावात फेकले, देशी बॉम्बचा वर्षाव! मतदानाच्या शेवटच्या टप्प्याला गालबोट
Satara Lok Sabha 2024 : उदयनराजे की शशिकांत शिंदे? साताऱ्यात कुणाची जादू चालणार?
lok-sabha-elections-2024-what-are-exit-polls-and-how-are-they-calculated read all answers here
Next Article
Exit Poll म्हणजे काय? तो कसा करतात? वाचा तुमच्या मनातील सर्व प्रश्नांची उत्तरं
;