नाशिक लोकसभेत महायुती समोर एकामागू एक प्रश्न निर्माण होत आहेत. आधीच या मतदार संघातून कोण लढणार यावर तोडगा निघााला नाही. त्यात आता शांगिगीरी महाराजांना आपण निवडणूक लढण्यावर ठाम असल्याचे सांगितले आहे. कोणत्याही स्थिती माघार घेणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे. महाराजांचा हा निर्णय म्हणजे महायुतीसाठी मोठा धक्का मानला जातोय. महाराजांनी निवडणूक रिंगणातून माघार घ्यावी यासाठी ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी शांतिगीरी महाराजांची भेट घेतली. पण महाराजांची समजूत काढण्यात त्यांना यश आले नाही.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
शांतिगीरी महाराजांची भूमिका काय?
शांतिगीरी महाराजांनी नाशिक लोकसभेसाठी अपक्ष आणि शिवसेनेकडून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. ही जागा महायुतीत अजूनही कोणाला सुटलेली नाही. अशा वेळी महाराजांनी अर्ज दाखल केला आहे. नाशिकमध्ये महाराजांचा भक्त परिवार मोठा आहे. जवळपास 1 लाख 88 हजाराच्या घरात हा परिवार आहे. ही निवडणूक लढली पाहीजे असा त्यांचा आग्रह आहे. त्यामुळे शिवसेनेने उमेदवारी दिली तर त्यांच्याकडून नाहीतर अपक्ष म्हणून निवडणूक लढणार असल्याचे महाराजांनी स्पष्ट केले आहे. भक्तगण घरोघरी जाऊन आपला प्रचार करतील आणि आपल्याला लोकसभेत पाठवतील असेही त्यांनी सांगितले.
हेही वाचा - '...ते चिंधी चोर, मंत्रालयही गुजरातला नेऊन ठेवतील' ठाकरे भडकले
गिरीश महाजान रिकाम्या हाताने परतले
शांतिगीरी महाराजांनी निवडणुकीतून माघार घ्यावी यासाठी ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी त्यांची भेट घेतली. शिवाय त्यांना थांबण्याची विनंती केली. मात्र यावेळी महाराज माघार घेण्याच्या मनस्थितीत नसल्याचे महाजन यांनी सांगितले. ही जागा कोणाल जाणार हे स्पष्ट नाही. ते स्पष्ट झाल्यानंतर आपण चर्चा करू असेही त्यांनी महाराजांना सांगितले. पण तरीही महाराजांनी आपण निवडणूक लढण्यावर ठाम असल्याचे सांगितले. दहा वर्षापूर्वीही महाराजांनी उमेदवारी मागितली होती. मात्र दोन्ही वेळा त्यांना निवडणुकीपासून थांबवण्यात आले होते. यावेळी मात्र त्यांनी निश्चय केल्याचे महाजन यांनी सांगितले.
महायुतीला फटका बसण्याची शक्यता
शांतिगीर महाजारांना मानणारा फार मोठा वर्ग नाशिकमध्ये आहे. हा वर्ग हिंदूत्वाला मानणारा आहे. हा वर्ग नेहमीच शिवसेना भाजपचा मतदार राहीला आहे. अशात जर शांतिगीरी महाराज निवडणूक रिंगणात आपली उमेदवारी कायम ठेवणार असतील तर त्याचा फटका महायुतीच्या उमेदवाराला बसण्याची शक्यता नाकारता येत नाही. महायुतीने अजूनही आपला उमेदवार जाहीर केलेला नाही. या मतदार संघावर शिवसेने शिंदे गट, राष्ट्रवादी अजित पवार गट आणि भाजपने दावा केला आहे. प्रत्येक पक्षाकडून एक दोन जण इच्छुक आहे. त्यात शांतिगीरी महाजांनीही अर्ज दाखल केला आहे. उमेदवार एक आणि इच्छुक अनेक अशी स्थिती सध्या महायुतीत आहे.