राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा आजपासून श्रीगणेशा केला आहे. बारामतीच्या कण्हेरीतील मारुतीच्या मंदिरात जाऊन नारळ फोडून शरद पवारांनी आजपासून प्रचाराला सुरुवात केली आहे. यावेळी खासदार सुप्रिया सुळे, आमदार रोहित पवार, संजय जगताप, राजेंद्र पवार, श्रीनिवास पवार यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते देखील उपस्थित होते.
याबाबत सुप्रिया सुळे यांनी ट्वीट देखील केलं आहे. साहेब आपल्या पहिल्या निवडणुकीपासून याच मंदिरात नारळ फोडून प्रचाराची सुरुवात करतात. गेली अनेक निवडणुकीतील हा शिरस्ता कायम आहे, असं सुप्रिया सुळे यांनी सांगितलं.
'कचा कचा' वक्तव्य भोवणार? अजित पवारांविरोधात आचारसंहिता भंगाची तक्रार
कण्हेरी येथे प्रचाराचा नारळ फोडल्यानंतर बोलताना सुप्रिया सुळे यांनी तीन टर्म खासदार केल्याबद्दल जनतेने आभार मानले. माझे आतापर्यंतचे काम पाहून जनतेने पुन्हा संधी द्यावी, असं आवाहन देखील सुप्रिया सुळे यांनी केलं.
यंदाची लोकसभा निवडणूक शेतकरी आणि कष्टकऱ्यांसाठी महत्वाची आहे. आगामी काळात सेवा, सन्मान आणि स्वाभिमान या त्रिसुत्रीवर आपण काम करणार आहोत. मी माझा 'काल' बदलू शकत नाही, मी माझा 'उद्या' नक्की बदलू शकते. एवढी ताकत माझ्यात आहे. त्यामुळे पुन्हा मला आशिर्वाद द्यावा, असं आवाहन देखील सुप्रिया सुळे यांनी केलं.
छत्रपती संभाजीनगरचा पेच सुटला?, शिवसेनाच्या 'या' बड्या नेत्याला उमेदवारी मिळण्याची शक्यता
बारातमी मतदारसंघाची अमेरिकेत चर्चा
कण्हेरी येथील कार्यक्रमात न्युयॉर्क टाईम्सचे पत्रकार देखील सामील झाले होते, याचा उल्लेख देखील सुप्रिया सुळे यांनी आपल्या भाषणात केला. देशातील लोकसभा निवडणुकीचे वृत्तांकन करण्यासाठी अनेक परदेशातील पत्रकारदेखील आले आहेत. त्यातही त्यांनी बारामती लोकसभा मतदारसंघ निवडला. त्यामुळे आपल्या मतदारसंघातील चर्चा आता अमेरिकेत देखील होत आहे. थोडक्यात पवार साहेबांची ताकत ही अमेरिकेपर्यंत पोहोचली आहे, हा आपल्याला मारुतीरायाने दिलेला आशीर्वाद आहे, असंही सुप्रिया सुळे यांनी म्हटलं.