शरद पवारांची साताऱ्यात भर पावसात झालेली सभा पाच वर्षानंतरही कोणी विसरले नाहीत. त्या एका सभेने 2019 च्या विधानसभा निवडणुकीचं चित्रच पालटून गेलं होतं. एकवेळी एकतर्फ वाटणारी निवडणूक या एका सभेने चुरशीची झाली. त्यावेळचे पवारांचे पावसात भिजत भाषण केलेले व्हिडीओ आणि फोटोही व्हायरल झाले होते. त्याचीच पुनरावृत्ती इचलकरंजी इथं झाली. शरद पवार इथं पक्षाचे उमेदवार मदन कारंडे यांच्या प्रचारासाठी आले होते. पवारांनी भाषणाला सुरूवात केला. त्याच वेळी पावसालाही सुरूवात झाली. पवारांनी पावसाला सुरूवात होताच आपलं भाषण थांबवलं नाही. तर त्यांनी भाषण सुरूच ठेवलं. त्यामुळे पावसात उभ्या असलेल्या लोकांनीही जोरदार घोषणाबाजी, टाळ्या आणि शिट्ट्या वाजवत पवारांना प्रतिसाद दिला.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
पवार व्यासपीठावर आले. त्यावेळी ढगाळ वातावरण होतं. पाऊस होणार अशी चिन्ह होती. त्यामुळे पवारांनी आल्या आल्या भाषणाला सुरूवात केली. पण भाषणाला पवार जसे उठले तसा पाऊस सुरू झाला. पवार पावसात भिजत होते. त्यावेळी उपस्थितांनी त्यांना जोरदार प्रतिसाद दिला. माझ्या सभेचा आणि पावसाचा काही तरी संबध आहे. मी बोलायला उभा राहीलो की पावसाला सुरूवात होते. त्यानंतर निवडणुकीचा निकालही चांगला लागतो. असे ते म्हणाले. त्यानंतर उपस्थितातंनी एकच जल्लोष करत शिट्ट्या आणि टाळ्यांनी संपूर्ण सभास्थळ दणाणून सोडलं.
ट्रेंडिंग बातमी - 'चला आपण एकत्र येवू', भाजप कार्यकर्त्यांना उद्धव ठाकरेंची साद, नेमकं काय घडलं?
इचलकरंजीत सभेसाठी आलो आहे. त्यावेळी पाऊस आला याचा आनंद आहे. पाऊस झाला की निकाल चांगला लागतो असेही ते म्हणाले. पावसामुळे पवार भाषण थांबवतील का काय असे वाटत होते. पण पवारांनी उपस्थिताना नाराज केले नाही. त्यांनी छोटे पण धमाकेदार भाषण केलं. लोकसभा निवडणुकीत आपल्याला चांगलं यश मिळालं. आता विधानसभेची निवडणूक आहे. महाराष्ट्राचा कारभार कोणाच्या हातात द्यायचा याचा आता तुम्हाला निकाल द्यायचा आहे.
ट्रेंडिंग बातमी - भिवंडीत समीकरण बदलणार? कपिल पाटलांनी सुत्र फिरवली, शिंदेंचा फायदा होणार?
गेल्या पाच वर्षाचा तुम्ही सरकारचा अनुभव तुम्हाला आहे. त्यामुळे हे सरकार बदलल्या शिवाय पर्याय राहीला नाही. त्यामुळेच महाविकास आघाडीच्या सर्व उमेदवारांना मोठ्या मताधिक्यानं विजयी करा असे आवाहन शरद पवारांनी भर पावसात केले. यावेळी त्यांच्या बरोबर कोल्हापूर जिल्ह्यातीले सर्व उमेदवार उपस्थित होते. पावसात सभा झाल्याने त्यांनाही आनंद झाला होता. शिवाय पवार पाऊस सुरू असतानाही बोलत होते त्यामुळे उपस्थितांनी ही त्याला जोरदार प्रतिसाद दिला. ही निवडणूक ऐतिहासिक असल्याचे सांगत मविआच्या उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन त्यांनी केले. मोजून पाच मिनिटाच्या भाषणांने त्यांनी उपस्थितांची मने जिंकली.