शिंदेंचा मोहरा भाजपाच्या गळाला, फडणवीसांच्या उपस्थितीमध्ये केला प्रवेश

निवडणुकांच्या राजकीय धामधुमीमध्ये पक्षांतराच्या घटना नव्या नाहीत. त्यातच आता शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षाचे विदर्भातील नेते राजू पारवे यांनी भाजपामध्ये प्रवेश केला आहे. 

जाहिरात
Read Time: 1 min
नागपूर:

संजय तिवारी, प्रतिनिधी

निवडणुकांच्या राजकीय धामधुमीमध्ये पक्षांतराच्या घटना नव्या नाहीत. महायुतीमधील नेते विरोधी पक्षांप्रमाणेच मित्र पक्षांमध्येही प्रवेश करत आहेत. भाजपाच्या काही नेत्यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करुन तिकीट मिळवलंय. त्यातच आता शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षाचे विदर्भातील नेते राजू पारवे यांनी भाजपामध्ये प्रवेश केला आहे. 

( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

दुसऱ्यांदा पक्षांतर

राजू पारवे यांनी 2019 साली नागपूर जिल्ह्यातील उमरेडमधून काँग्रेसकडून विधानसभा निवडणूक लढवली होती. त्या निवडणुकीत पारवे विजयी झाले. त्यानंतर यावर्षी मार्च महिन्यात त्यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत शिवसेनेत प्रवेश केला. शिवसेनेकडून रामटेक लोकसभा मतदारसंघातून त्यांनी निवडणूक लढवली. पण, त्यामध्ये त्यांचा पराभव झाला.

( नक्की वाचा : Sharad Pawar : निवृत्तीचा इशारा की इमोशनल कार्ड? शरद पवारांच्या नव्या घोषणेचा अर्थ काय? )

लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर  उमरेड विधानसभा निवडणूक लढवण्यास ते उत्सुक होते. पण, ती जागा भाजपाकडं गेल्यानंतर त्यांनी बंडखोरी करत अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला. मात्र त्यांनी तो अर्ज शेवटच्या दिवशी (सोमवार, 4 नोव्हेंबर) मागे घेतला. त्यानंतर त्यांनी शिंदे यांची शिवसेना सोडून भाजपामध्ये प्रवेश केला.

Advertisement

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला.  त्यामुळे, पुढच्या लोकसभा निवडणुकीत रामटेकची जागा शिवसेना (एकनाथ शिंदे) लढविणार की भाजप हा प्रश्न आतापासून विचारला जातो आहे.