Nagpur News : आईला मुखाग्नी देत होते योगेश गोन्नाडे, शिवसेनेने स्मशानभूमीतच सोपवलं तिकीट

एकीकडे आईच्या निधनानं दु:ख तर दुसरीकडे अपेक्षा नसताना अचानक उमेदवारी मिळाल्याने गोन्नाडे भावुक झाले आहेत.

जाहिरात
Read Time: 2 mins
योगेश गोन्नाडे
वाचा
Summary is AI-generated, newsroom-reviewed
  • शिवसेना ने योगेश गोन्नाडे को श्मशान घाट जाकर दे दिया टिकट
  • गोन्नाडे मां को मुखाग्नि दे रहे थे तभी पार्टी के अधिकारी ने उन्हें दिया एबी फॉर्म
  • महाराष्ट्र निकाय चुनाव के लिए सभी दल अपने दांव-पेच जारी रखे हुए हैं
आमच्या एआय सारांशामुळे मदत मिळाली?
आम्हाला नक्की कळवा.
नागपुर:

Nagpur News : महाराष्ट्रात महापालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. अनेक इच्छुकांना पक्षाकडून तिकीट नाकारल्यामुळे संतापाची लाट उसळली आहे. काही आनंद साजरा करीत आहेत तर काही इच्छुकांना तिकीट नाकारल्याने त्यांच्या संतापाचा व्हिडिओ समोर आला आहे. यापैकी एक उमेदवार असाही होता, जो आपल्या आईला मुखाग्नी देत होता, आणि तेथेच त्याला पक्षाने एबी फॉर्म दिला. नागपुरात शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार योगेश गोन्नाडे यांना थेट स्मशानभूमीत निवडणूक लढवण्यासाठी तिकीट सोपवण्यात आलं.

स्मशानभूमीतच उमेदवाराला सोपवलं तिकीट...

नागपूर महानगरपालिका प्रभाग क्रमांक-५ मधून शिवसेनेने गोन्नाडे यांना उमेदवारी दिली आहे. इतकच नाही तर प्रभाग क्रमांक-८ मधून गोन्नाडे यांची मुलगी कृतिका गोन्नाडे यांना शिंदे गटाकडून मैदानात उतरवण्यात आलं आहे. सोमवारी गोन्नाडे यांच्या आईचं निधन झालं आणि मंगळवारी नागपूरच्या एका स्मशानभूमीत त्यांच्या अंत्यसंस्कार केले जात होते. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची वेळ दुपारी ३ वाजेपर्यंत असल्याने, स्थानिक शिवसेना नेते थेट स्मशानभूमीत गेले आणि त्यांनी गोन्नाडे यांना पक्षाचं तिकीट दिलं. 

नक्का वाचा - Nashik News : नाशिकमधील माजी नगरसेवक तुरुंगातून निवडणुकीच्या रिंगणात, आरोपीच्या मुलालाही उमेदवारी

गोन्नाडे यांच्या मुलीलाही तिकीट....

स्थानिक नेत्यांनी योगेश आणि त्यांची मुलगी कृती हिला एबी फॉर्म सोपवले आहेत. गोन्नाडे पुढे म्हणाले, एकीकडे आईच्या निधनानं दु:ख तर दुसरीकडे अपेक्षा नसताना अचानक उमेदवारी मिळाल्याने गोन्नाडे भावुक झाले आहेत. पक्षाकडून एबी फॉर्म दिल्यानंतर गोन्नाडे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. 

गेल्या काही दिवसात इच्छुकांना तिकीट मिळण्यापासून तिकीट कापले जाण्यापर्यंतच्या अनेक अनोख्या घटना समोर येत आहेत. नाशिक, छत्रपती संभाजीनगर आणि पुण्यात भाजपच्या पदाधिकाऱ्यांकडून संताप व्यक्त केला आहे. अनेक ठिकाणी वातानरण बिघडल्याचंही समोर आलं होतं. 

Advertisement