जाहिरात

Nashik News : नाशिकमधील माजी नगरसेवक तुरुंगातून निवडणुकीच्या रिंगणात, आरोपीच्या मुलालाही उमेदवारी

नाशिककर निवडणुकीतील कारागृह पॅटर्नचा स्वीकार करणार की नाही हे येत्या १५ दिवसात समोर येईल. 

Nashik News : नाशिकमधील माजी नगरसेवक तुरुंगातून निवडणुकीच्या रिंगणात, आरोपीच्या मुलालाही उमेदवारी

प्रांजल कुलकर्णी, प्रतिनिधी

Nashik Municipal Corporation Elecion : राज्यभरात महापालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. ३० डिसेंबरला अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस होता. या दिवशी राज्यभरात विविध पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये असंतोषाचं वातावरण होतं. अनेक इच्छुकांना डावलण्यात आल्याचा आरोप केला जात आहे. नाशिकमध्ये तर थेट कारागृहातून निवडणूक लढवली जात असल्याचं समोर आलं आहे.

प्रकाश लोंढे यांची सूनही निवडणुकीच्या रिंगणात...

नाशिकमधील एक माजी नगरसेवक कारागृहातून निवडणूक लढवणार असल्याचं समोर आलं आहे. मोक्का कायद्याअंतर्गत कारवाई केलेले आणि सध्या कारागृहात शिक्षा भोगणारे प्रकाश लोंढे प्रभाग क्रमांक 11 मधून कारागृहातूनच निवडणूक लढवणार आहे.  कायदेशीरदृष्ट्या दोषी ठरून शिक्षा सुनावणी जाईपर्यंत निवडणूक लढवण्यास बंदी नसते, त्यातून प्रकाश लोंढे निवडणूक लढवणार आहेत. विशेष म्हणजे लोढें यांची सूनदेखील निवडणुकीच्या रिंगणात आहे. तर दुसरीकडे नाशिकच्या धोत्रे खून प्रकरणात कारागृहात शिक्षा भोगणारे भाजपचे माजी नगरसेवक उद्धव निमसे यांचे पुत्र रिद्धीश निमसे यांना भाजपकडून प्रभाग क्रमांक 2 मधून उमेदवारी देण्यात आली आहे.  नाशिकमधील सागर जाधव गोळीबार प्रकरणात कारागृहात शिक्षा भोगणारे जगदीश पाटील देखील निवडणूक लढवणार असल्याची चर्चा होती. मात्र त्यांना तिकीट देण्यात आलं नाही. 

Mira-Bhayandar : उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आनंद; उमेदवाराचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू, अजित पवार गटाला धक्का

नक्की वाचा - Mira-Bhayandar : उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आनंद; उमेदवाराचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू, अजित पवार गटाला धक्का

नाशिक निवडणुकीचा कारागृह पॅटर्न...

नाशिक पोलिसांनी मोक्का कायद्याअंतर्गत आरोपी आणि सध्या कारागृहात शिक्षा भोगणारे लोंढे या गुन्हेगारी टोळीचे प्रकाश लोंढे प्रभाग क्रमांक 11 मधून कारागृहातूनच निवडणूक लढवणार आहेत. न्यायालयाच्या परवानगीनंतर त्यांनी आपला उमेदवारी अर्ज पॉवर ऑफ ॲटर्नी देण्यात आलेल्या व्यक्तीमार्फत दाखल केला आहे. प्रकाश लोंढे हे आरपीआय आठवले गटाचे जिल्हाध्यक्ष असून माजी नगरसेवक देखील आहेत. सातपूर परिसरातील एका गोळीबार प्रकरणी प्रकाश लोंढे त्यांचा मुलगा भूषण लोंढे आणि मुलगा दीपक लोंढे यांच्यासह सहकाऱ्यांवर सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. यासोबतच प्रकाश लोंढे यांची सून दीक्षा लोंढे यांनी देखील याच प्रभागातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. 

नाशिकच्या धोत्रे खून प्रकरणात कारागृहात शिक्षा भोगणारे भाजपचे माजी नगरसेवक उद्धव निमसे यांचे पुत्र रिद्धीश निमसे यांना भाजपकडून प्रभाग क्रमांक 2 मधून उमेदवारी देण्यात आली आहे. उद्धव निमसे कारागृहात असताना उद्धव निमसे यांच्या मुलाला प्रभागातील पक्षीय बलाबल व  राजकीय ताकद बघता  भाजपकडून उमेदवारी देण्यात आल्याची चर्चा आहे, या प्रभागात ईतरही अनेक इच्छुक उमेदवार होते मात्र त्यांना डावलून रिद्धीशला संधी देण्यात आली.

त्यामुळे नाशिककर निवडणुकीतील कारागृह पॅटर्नचा स्वीकार करणार की नाही हे येत्या १५ दिवसात समोर येईल. 
 

Listen to the latest songs, only on JioSaavn.com