जाहिरात

विधानपरिषद निवडणुकीत महायुतीचं टेन्शन वाढलं, मिलिंद नार्वेकरांकडून अर्ज दाखल

शिवसेना ठाकरे गटाकडून मिलिंद नार्वेकर यांनी निवडणुकीचा अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे 11 जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीत 12 उमेदवार रिंगणात आहेत.

विधानपरिषद निवडणुकीत महायुतीचं टेन्शन वाढलं, मिलिंद नार्वेकरांकडून अर्ज दाखल

विधानपरिषद निवडणुकीत नवा ट्विस्ट आला आहे. शिवसेना ठाकरे गटाकडून मिलिंद नार्वेकर यांनी निवडणुकीचा अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे 11 जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीत 12 उमेदवार रिंगणात आहेत. त्यामुळे विधानपरिषदेची निवडणूक अटळ आहे. 

'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

 मिलिंद नार्वेकर यांच्या उमेदवारीने महायुतीचं टेन्शन वाढलं आहे. मिलिंद नार्वेकर निवडणुकीत उतरलेल्याने मते फुटण्याची महायुतीचे मते फुटण्याची भीती वर्तवली जात आहे. त्यामुळे मिलिंद नार्वेकर यांच्या उमेदवारीची फटका कुणाला बसणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. 

शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार कृपाल तुमाने आणि भावना गवळी यांचा अर्ज भरतेवेळी मिलिंद नार्वेकर हे देखील निवडणूक कार्यालयात उपस्थित होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दोन नेते देखील त्यावेळी आत उपस्थित होते. दोन्ही मंत्री गेल्यानंतर उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीचे नेते आतमध्ये गेले. 

विधानपरिषदेसाठीचे उमेदवार

भाजप

  • सदाभाऊ खोत
  • परिणय फुके
  • पंकजा मुंडे
  • अमित गोरखे
  • योगेश टिळेकर

(नक्की वाचा -'हिंदूं'वरुन गांधी-मोदींमध्ये खडाजंगी, लोकसभेत नेमकं काय झालं?)

काँग्रेस

  • प्रज्ञा सातव

शिवसेना ठाकरे गट

  • मिलिंद नार्वेकर

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट

  • जयंत पाटील (शेकाप)

(नक्की वाचा- राहुल गांधींच्या भाषणातील मोठा भाग हटवला, आजही संसदेत पुन्हा खडाजंगीची शक्यता)

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट

  • शिवाजी गर्जे
  • राजेश विटेकर

शिवसेना

  • भावना गवळी
  • कृपाल तुमाने

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com