जाहिरात
Story ProgressBack

शिवसेना ठाकरे गटाचा वचननामा जाहीर; राज्यातील जनतेसाठी काय आहेत आश्वासने?

महाराष्ट्राचं वैभव लुटलं जातंय. इंडिया आघाडीचं सरकार आलं तर ही लूट आम्ही थांबवू, असं शिवसेना ठाकरे गटाच्या वचननाम्यामध्ये जाहीर करण्यात आलं आहे.

Read Time: 2 min
शिवसेना ठाकरे गटाचा वचननामा जाहीर; राज्यातील जनतेसाठी काय आहेत आश्वासने?

लोकसभा निवडणुकीसाठीचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा वचननामा गुरुवारी (२५ एप्रिल) जाहीर करण्यात आला. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते वचननामा जाहीर करण्यात आला आहे. यावेळी बोलताना उद्धव ठाकरे यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला. 

शेतकरी कर्जबाजारी होणार नाहीत यासाठी खबरदारी घेतली जाईल, तरुणांना रोजगार उपलब्ध करून देणार, तरुणांचा रोजगारासाठी होणारं स्थलांतर थांबवण्याचा प्रयत्न करणार, महाराष्ट्राची प्रगती अधिक जोमाने करु, अशा घोषणा शिवसेना ठाकरे गटाच्या वचननाम्यामध्ये करण्यात आल्या आहेत. 

(नक्की वाचा - 'आरशात पाहिलं की औकात कळेल', श्रीकांत शिंदेंनी काढली आदित्य ठाकरेंची लायकी)

'आज महाराष्ट्रातले उद्योगधंदे पळवले जात आहेत. महाराष्ट्राचं वैभव लुटलं जातंय. इंडिया आघाडीचं सरकार आलं तर ही लुट आम्ही थांबवू. मोदी सरकारने राज्यात जो खड्डा पाडलाय तो आम्ही भरुन काढू. महाराष्ट्राची प्रगती आम्ही अधिक वेगाने करू', असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं.  

'इंडिया आघाडीचं सरकार आल्यास आम्ही कोणत्याही राज्यावर अन्याय होऊ देणार नाही. सर्व राज्यांना त्यांच्या वाट्याचं जे काही आहे ते मिळेल. 
शहरी भागात रोजगाराची संधी उपलब्ध करत असताना ग्रामीण भागातील तरुणांचा देखील त्यांच्या गावाजवळ रोजगार मिळावा यासाठी प्रयत्न करणार आहोत, असंही उद्धव ठाकरे यांनी म्हटलं.  

(नक्की वाचा : उंटावरुन शेळ्या, वाघाचं कातडं ते रिंगमास्टर; डोंबिवलीत मुख्यमंत्र्यांची ठाकरेंविरोधात टोलेबाजी )

शिवसेनेच्या वचननाम्यांनी ठळक मुद्दे 

  • मुंबईत आंतरराष्ट्रीय आर्थिक केंद्र स्थापन करणार. 
  • ग्रामीण भागातील युवक-युवतींना स्थानिक पातळीवरच रोजगाराची संधी उपलब्ध करुन देणार.
  • जिल्हा रुग्णालय आधुनिक उपकरणांनी सुसज्ज करणार. 
  • जीएसटी प्रणालीत सुधारणा करणार. 
  • राज्याला केंद्राकडे हात पसरावे लागणार नाही याची व्यवस्था करणार. 
  • बी-बियाणे शेतीची अवजारे जीएसटी मुक्त करणार.
  • जैतापूर, बारसू, वाढवण बंदर यासारखे प्रकल्प महाराष्ट्रातून हद्दपार करणार. 
  • आशा अंगणवाडी सेविकांचे मानधन दुप्पट करणार. 
  • कोडींग, खगोलशास्त्र, आर्थिक साक्षरता यात युवक सुक्षितीत व्हावेत, यासाठी शिक्षण क्षेत्राला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देणार. 
  • मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देणार.
  • Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

    Follow us:
    डार्क मोड/लाइट मोड बदलण्यासाठी
    Our Offerings: NDTV
    • मध्य प्रदेश
    • राजस्थान
    • इंडिया
    • मराठी
    • 24X7
    Choose Your Destination