सोलापूर लोकसभेतल्या एक उमेदवार सध्या भलत्याच चर्चेत आहेत. त्याचे कारणही तसेच आहे. त्याचं नाव आहे श्रीदेवी फुलारे. गोल्डन नगरसेविका म्हणून त्यांची शहरात ओळख आहे. त्यांनी नुकताच लोकसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यावेळी त्या चक्क फाटकी साडी घालून आल्या होत्या. विशेष म्हणजे सोन्याची आवड असलेल्या आणि नेहमी 125 तोळे सोनं घालुन मिरवणाऱ्या फुलारे सर्वांनाच परिचयाच्या आहेत. पण फाटकी साडी नेसून उमेदवारी दाखल केल्याने सध्या शहरात एकच चर्चा होत आहे.
फाटकी साडी नेसून उमेदवारी अर्ज का?
श्रीदेवी फुलारे फाटकी साडी घालून उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आल्या होत्या. विशेष म्हणजे त्यावेळी त्या अलिशान गाडीतून खाली उतरल्या. मात्र त्यांना याबाबत विचारल्यावर त्यांनी फाटकीच साडी का घातली याचा खुलासा केला. सोलापूरचा विकास हा फाटला झाला आहे. जे निवडून आले त्यांनी जनतेकडे दुर्लक्ष केले. स्वताचा स्वार्थ पाहीला. लोकांसाठी काही केले नाही. याचा निषेध म्हणून फाटकी साडी घालून उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आल्याचं त्यांनी सांगितलं.
हेही वाचा - गावितांना धक्का! बडा नेता काँग्रेसकडे गेला, नंदूरबारचं गणित बिघडणार?
कोण आहेत श्रीदेवी फुलारे?
सोलापूर शहरात गोल्डन नगरसेविका म्हणून त्यांची ओळख आहे. फुलारे यांनी 2007 मध्ये शिवसेनेकडून सोलापूर महापालिकेची निवडणूक लढली. त्यात त्यांचा पराभव झाला होता. त्यानंतर त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. 2012 आणि 2017 या दोन्ही निवडणुका काँग्रेसच्या चिन्हावर लढवून विजयी झाल्या. काँग्रेसकडून निवडून आलेल्या श्रीदेवी फुलारे मागील काही वर्षांपासून मात्र पक्षापासून अंतर राखून आहेत. त्यांनी वंचित आणि सकल मराठा समाजाकडे सोलापूर लोकसभेच्या उमेदवारीची मागणी केली होती. पण त्यांना उमेदवारी मिळाली नाही. त्यामुळे त्यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
हेही वाचा - नांदेडमध्ये चिखलीकर मैदानात प्रतिष्ठा मात्र चव्हाणांची पणाला
काँग्रेसमध्ये बंडखोरी
सोलापूर लोकसभेतून काँग्रेसने प्रणिती शिंदे यांना उमेदवारी दिली आहे. तर भाजपने राम सातपूते यांना मैदानात उतरवले आहे. श्रीदेवी फुलारे या काँग्रेसच्या नगरसेविका आहे. त्यात त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्याने काँग्रेसमध्ये बंडखोरी झाल्याचे बोलले जात आहे.
हेही वाचा - 'बारामतीत अजित पवारांना हरवणार, मग पक्ष सोडणार'