लोकसभेच्या पराभवानंतर सुनेत्रा पवारांची आज विधानसभेत राज्यसभेचा उमेदवारी अर्ज दाखल केला. राज्यसभेवर त्यांची बिनविरोध निवड झाली आहे. यानंतर बारामतीच्या काठेवाडीत कार्यकर्त्यांचा जल्लोष पाहायला मिळाला. त्यांच्या विरोधात एकही उमेदवार दिला नसल्याने सुनेत्रा पवारांची बिनविरोध निवड झाली आहे.
अर्ज भरताना राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे नेते उपस्थित होते, मात्र महायुतीच्या उमेदवारांची यावेळी दांडी मारल्याचं पाहायला मिळालं. बारामती लोकसभा मतदारसंघातून पराभव झालेल्या सुनेत्रा पवारांनी आता संसदेत मागच्या दरवाजानं एन्ट्री घेतली आहे. राज्यसभेसाठी सुनेत्रा पवार यांनी उमेदवार अर्ज दाखल केला. त्यांच्या विरोधात एकही अर्ज आलेला नाही. त्यामुळे सुनेत्रा पवारांची निवड बिनविरोध होणार हे जवळपास आधीच निश्चित झालं होतं.
आज विधानभवनात जाऊन सुनेत्रा पवारांनी अर्ज भरला. दरम्यान यावेळी अजित पवार उपस्थित होते. शिवाय सुनील तटकरे, प्रफुल पटेल आणि छगन भुजबळही उपस्थित होते. राज्यसभेच्या उमेदवारीसाठी छगन भुजबळ, प्रफुल पटेलही इच्छुक होते, मात्र उमेदवारीची माळ सुनेत्रा पवारांच्या गळ्यात पडली आहे.
नक्की वाचा - बारामतीचे 'दादा' बदला!, विधानसभेला युगेंद्र पवार विरुद्ध अजित पवार सामना रंगणार?
छगन भुजबळ नाराज?
बुधवारी झालेल्या बैठकीत एनसीपीचे कार्यकारी अध्यक्ष प्रफुल पटेल यांनी सुनेत्रा पवारांच्या नावाचा प्रस्ताव ठेवला होता आणि आपली भूमिका मांडण्यास सांगितली होती. यावेळी कृषी मंत्री धनंजय मुंडेंनी प्रफुल पटेलांच्या प्रस्तावाचं समर्थन केलं. मात्र एनसीपीचे वरिष्ठ मंत्री छगन भुजबन यांनी या प्रस्तावावर नाराजी व्यक्त केली. मी आणि परांजपे या उमेदवारीसाठी इच्छुक असल्याचं भुजबळांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं. भुजबळ राज्यसभेसाठी इच्छूक होते, मात्र त्यांचा नावाची शिफारस करण्यात आली नव्हती, यामुळे भुजबळ नाराज होते. मी राज्यसभेच्या जागेसाठी इच्छुक होतो. पण पक्षाच्या नेत्यांनी निर्णय घेतला आहे. पार्टीत वरिष्ठ निर्णय घेतात. पक्षाने घेतलेला निर्णय मान्य करावे लागेल, असं म्हणज भुजबळांनी अप्रत्यक्षपणे नाराजी व्यक्त केली.