जितेंद्र जाधव, प्रतिनिधी
बारामती लोकसभा मतदारसंघात सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार या नणंद-भावजयांमध्ये सामना होत आहे. या दोन्ही उमेदवारांनी गुरुवारी (18) मोठं शक्तीप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज भरला. विद्यमान खासदार सुप्रिया सुळेंना घरातूनच आव्हान मिळल्यानं ही निवडणूक रंगतदार बनलीय. संपूर्ण देशाचं या निवडणुकीकडं लक्ष आहेत. त्याचबरोबर ही निवडणूक अमेरिकेपर्यंत पोहचली असल्याचा दावा सुप्रिया सुळे यांनी केला. सुळे यांनी बारामतीमध्ये प्रचाराला सुरुवात केलीय. त्यावेळी त्यांनी हा दावा केला.
अमेरिकेतही दखल
'माझं काम आणि मेरिट बघून मला संधी द्या. बारातमतीची निवडणूक अमेरिकेपर्यंत पोहोचली आहे. न्यूयॉर्क टाईम्सचे पत्रकार दोन दिवसांपासून बारामतीमध्ये आले आहेत, अशी माहिती सुप्रिया सुळे यांनी दिली. मी एक पुस्तक काढणार असून ते विरोधकांना पाठवणार आहे. त्यामध्ये मी काय काम केलं हे दाखवणार आहे. उद्या जे-जे कान्हेरीमधील येतील ते मलाच मतदान करतील, असा दावा त्यांनी केला. सुनेत्रा पवार कान्हेरीमध्ये प्रचारासाठी येणार आहेत. तो संदर्भ देत सुप्रिया सुळे यांनी हा दावा केला.
मी बारामतीमध्ये कमी येते असं काही जणं म्हणाले होते. पण, मी दिल्लीत असणार आणि बाकीचे कामं इथले लोकं करणार असं ठरलं होतं, असा टोला त्यांनी अजित पवारांचें नाव न घेता लगावला. मी नात्यांचा सन्मान केला. पदाचा सन्मान केला. झालं गेलं गंगेला वाहिलं पण आता बदल करावं लागेल. आपली लढाई ही वैयक्तिक नाही वैचारिक आहे, असं सुळे यांनी यावेळी सांगितलं.
'तो' प्रश्न आणि सुनेत्रा पवारांच्या डोळ्यात टचकन पाणी! नेमकं काय घडलं?
एकीकडे संसदरत्न आणि दुसरिकडे...
सुप्रिया सुळे यांनी यावेळी बोलताना नरेंद्र मोदी सरकारवरही टीका केली. मला एकीकडं संसदरत्न देतात दुसरिकडं निलंबित करतात. मला फाशी दिली तरी चालेल मी कांद्याला भाव मागत राहणार. दिल्लीवाल्यांना मी आणि अमोल कोल्हे नडतो. फार भानगड करायची नाही आपली तुतारी वाजवायची, हेच आपलं लक्ष आहे, असं त्यांनी मतदारांना बजावलं.
घरची-बाहेरची वाद पेटला
दरम्यान, बारामतीमध्ये सुनेत्रा पवार यांच्या उमदेवारीवरुन नवा वाद सुरु झाला आहे. शरद पवारांनी सुनेत्रा पवार यांचा उल्लेख बाहेरच्या पवार असा केला होता. त्याला उपमुख्यंत्री अजित पवार यांनी उत्तर दिलंय. 'सुनेत्रा पवार या बाहेरच्या नाही, तर बारामतीकरांच्या मनामनातील सूनबाई आहेत, असं फडणवीसांनी सांगितलं. सुनेत्रा पवार यांचा उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी महायुतीची जाहीर सभा झाली त्यावेळी ते बोलत होते. यावेळी महायुतीकडून जोरदार शक्तीप्रदर्शन करण्यात आले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, रामदास आठवले हे महायुतीचे प्रमुख नेते उपस्थित होते.