Ulhasnagar News : शिंदे गटाचा पहिला डाव, वंचितच्या 2 नगरसेवकांचा पाठिंबा; बहुमतासाठी किती जागांची गरज?

२९ महानगरपालिकांच्या निकालानंतर महापौरपदाची घोडदौड सुरू झाली आहे. बहुमताचा आकडा गाठण्यासाठी पक्षश्रेष्ठींकडून नगरसेवकांच्या भेटी-गाठी घेतल्या जात आहेत.

जाहिरात
Read Time: 2 mins

Ulhasnagar Municipal Corporation Election 2026 : २९ महानगरपालिकांच्या निकालानंतर महापौरपदाची घोडदौड सुरू झाली आहे. बहुमताचा आकडा गाठण्यासाठी पक्षश्रेष्ठींकडून नगरसेवकांच्या भेटी-गाठी घेतल्या जात आहेत. उल्हासनगरमध्ये भाजपला ३७ जागा मिळाल्या असून शिवसेना ३६ जागांवर आहे. उल्हासनगरमध्ये ७८ जागा असून बहुमतासाठी ४० आकडा गाठणं अपेक्षित आहे. मात्र दोन्ही पक्षांना बहुमताचा आकडा गाठला आलेला नाही. दरम्यान शिंदे गटाने पहिला डाव खेळत वंचित बहुजन आघाडीकडून निवडून आलेल्या दोन नगरसेवकांनी शिवसेनेला पाठिंबा जाहीर केला आहे. 

मात्र दोन जागा बहुमतासाठी पुरेशा नाहीत. शिंदे गटाला ३६ जागा मिळाल्या आहेत. त्यात दोन नगरसेवकांची भर पडली तरी आणखी दोन उमेदवारांची आवश्यकता आहे. शिंदे गट हे गणित कसं जुळवणार हे येत्या काही दिवसात स्पष्ट होईल.

नक्की वाचा - Badlapur News : बदलापुरात शिंदे गटाला मोठा धक्का; घराणेशाहीला बगल, नगरपालिकेत भाजपची ताकद वाढली!

एकनाथ शिंदेंना दिलं पाठिंब्याचं पत्र...

उल्हासनगर महानगरपालिका निवडणुकीत वंचितकडून निवडून आलेले सुरेखा सोनावणे आणि विकास खरात या दोन नगरसेवकांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना त्यांच्या मुंबईतील निवासस्थानी भेट घेऊन आपल्या पाठिंब्याचे पत्र सुपूर्द केले. यावेळी कल्याण डोंबिवलीचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे हेदेखील उपस्थित होते.

Advertisement

आपल्या प्रभागाच्या सर्वांगिण विकासासाठी तसेच दलित वस्ती सुधार योजनेच्या माध्यमातून आपल्या प्रभागातील कामे करण्यात यावीत यासाठी हा पाठिंबा देत असल्याचे त्यांनी यावेळी उपमुख्यमंत्री शिंदे यांना सांगितले. यावेळी आमदार डॉ. बालाजी किणीकर, माजी नगराध्यक्ष सुनील चौधरी आणि नगरसेवक योगेश जानकर, प्रवक्ते राहुल लोंढे हेदेखील यावेळी उपस्थित होते.