जाहिरात

Badlapur News : बदलापुरात शिंदे गटाला मोठा धक्का; घराणेशाहीला बगल, नगरपालिकेत भाजपची ताकद वाढली! 

बदलापूर नगरपालिकेची सत्ता काबीज केल्यानंतर भाजपने शिंदेसेनेला आणखी एक मोठा धक्का दिला आहे. 

Badlapur News : बदलापुरात शिंदे गटाला मोठा धक्का; घराणेशाहीला बगल, नगरपालिकेत भाजपची ताकद वाढली! 

Badlapur News : नगरपालिका निवडणुकीच्या निकालात बदलापुरातील महापौरपद भाजपकडे गेलं आणि शिंदे गटाला मोठा धक्का बसला. या घटनेला काही आठवडे उलटले आहेत. त्यानंतर बदलापुरात शिंदे गटाला आणखी एक हादरा बसला आहे. नुकत्याच झालेल्या महानगरपालिकेच्या निवडणुकीत शिंदे गटाला अपेक्षित यश मिळू शकलेलं नाही. भाजप सर्वाधिक जागा मिळवून राज्यातील पहिला पक्ष ठरला आहे. बदलापूर नगरपालिकेची सत्ता काबीज केल्यानंतर भाजपने शिंदेसेनेला आणखी एक मोठा धक्का दिला आहे. 

नगरपालिकेतील भाजपची ताकद वाढली...

शिंदेसेनेचे उपशहरप्रमुख प्रवीण राऊत यांच्यासह शेकडो शिवसैनिकांनी भाजपमध्ये पक्षप्रवेश केला आहे. शिंदेसेनेत सुरू असलेली घराणेशाही मोडून काढण्यासाठीच हा पक्षप्रवेश केल्याची प्रतिक्रिया आमदार किसन कथोरे यांनी दिली आहे. महत्वाचं म्हणजे प्रवीण राऊत यांची पत्नी शीतल राऊत आणि वहिनी विजया राऊत या शिवसेनेच्या नगरसेविका आहेत. तर शिवसेनेच्याच नगरसेविका दीपाली लामतुरे यांचे पती गणेश लामतुरे यांनीही शिवसेना सोडून भाजपचं कमळ हाती घेतलं आहे. त्यामुळे बदलापूर नगरपालिकेत भाजपची ताकद वाढली आहे. आता प्रवीण राऊत यांना भाजपकडून स्वीकृत नगरसेवकपद दिलं जाण्याची चर्चा आहे.

Election 2026:महापौरपदासाठी पक्षांमध्ये लॉबिंग, मात्र अद्याप प्रतीक्षाच; आरक्षण सोडतीनंतर नावावर शिक्कामोर्तब

नक्की वाचा - Election 2026:महापौरपदासाठी पक्षांमध्ये लॉबिंग, मात्र अद्याप प्रतीक्षाच; आरक्षण सोडतीनंतर नावावर शिक्कामोर्तब

घराणेशाहीला मोडून काढण्यासाठी पक्षप्रवेश...

बदलापुराचे शिंदे गटाचे माजी नगराध्यक्ष वामन म्हात्रे यांच्यावर अनेकदा घराणेशाहीचा आरोप केला जातो. नगरपालिका निवडणुकीतही वामन म्हात्रे यांच्या घरातील सहा सदस्यांना उमेदवारी देण्यात आली होती. हे प्रकरण मोठं चर्चेत आलं होतं. वामन म्हात्रे कुटुंबातील सदस्यांना राजकारणात संधी देत असल्याचा आरोप त्यांच्यावर केला जात आहे. त्यातच शिंदे गटाचे उपशहरप्रमुख प्रवीण राऊत यांच्यासह शेकडो शिवसैनिकांनी भाजपात प्रवेश केला आहे. घराणेशाही मोडून काढण्यासाठी हा पक्षप्रवेश केल्याची प्रतिक्रिया भाजप आमदार किसन कथोरे यांनी केली आहे. 
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com