- तमिळनाडू विधानसभा निवडणुकीत टीव्हीके पक्षाला १०८ जागा मिळाल्या असून त्यांना काँग्रेसचा पाच आमदारांचा पाठिंबा
- विजय यांनी सरकार स्थापनेचा दावा केला पण बहुमतासाठी आवश्यक असलेल्या ११८ जागांमध्ये अद्याप कमतरता आहे
- राज्यपाल राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर यांनी विजय यांच्या बहुमताच्या दाव्यावर शंका व्यक्त केली आहे
Tamil Nadu Election: तमिळनाडूच्या राजकारणात सध्या मोठी खळबळ उडाली आहे. विधानसभा निवडणुकीत सर्वाधिक जागा मिळवल्यानंतर 'टीव्हीके' (TVK) प्रमुख विजय यांनी बुधवारी राजभवनात जाऊन राज्यपाल राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर यांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी सरकार स्थापनेचा दावा केला. मात्र, विजय यांनी सादर केलेल्या बहुमताच्या आकड्यावर राज्यपाल समाधानी नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. विजय यांच्या टीव्हीकेचे 108 आमदार निवडून आले आहेत. तर त्यांना काँग्रेसच्या 5 आमदारांचा पाठिंबा आहे. असे मिळून 113 आमदार सध्या विजय यांच्या बाजूने आहेत. त्यांना बहुमतासाठी आणखी 5 आमदारांची गरज आहे. त्यामुळे गुरुवारी होणारा शपथविधी सोहळा अनिश्चिततेच्या गर्तेत सापडला आहे.
बहुमताचा पेच कायम
तमिळनाडू विधानसभेच्या एकूण 234 जागांपैकी बहुमतासाठी 118 हा आकडा गाठणे आवश्यक आहे. विजय यांच्या 'तमिळगा वेत्री कळघम' पक्षाने 108 जागा जिंकून सर्वात मोठा पक्ष होण्याचा मान मिळवला आहे. मात्र, बहुमतासाठी अद्याप 10 जागांची कमतरता आहे. त्यांना काँग्रेसने पाठिंबा देऊ केला आहे. काँग्रेसचे पाच आमदार आहे. त्यामुळे हा आकडा 113 पर्यंत पोहोचला आहे. डाव्या पक्षांचे चार आमदार आहेत. त्यांचा ही पाठिंबा मिळेल असा विजय यांना विश्वास आहे. अन्य छोटे पक्ष ही त्यांच्या संपर्कात आहेत. त्यामुळे ते बहुमताला गवसणी घालतील अशी स्थिती आहे. विजय यांनी 7 मे रोजी सकाळी 11.30 वाजता शपथविधी घेण्याची विनंती राज्यपालांना केली आहे. परंतु राज्यपालांनी अद्याप हिरवा कंदील दाखवलेला नाही.
नक्की वाचा - Tamil Nadu Election: थलपती विजयच्या TVK ला काँग्रेसचा पाठिंबा; मात्र ठेवली मोठी अट
राजकीय हालचालींना वेग
विजय यांच्यासोबत 'बुस्सी' आनंद, के.ए. सेंगोट्टैयन यांसारखे ज्येष्ठ नेते उपस्थित होते. पक्षाने विधीमंडळ गटनेतेपदी विजय यांची निवड केली असली आहे. तरी संख्याबळाअभावी पेच निर्माण झाला आहे. राज्यपाल आता नेमका काय निर्णय घेतात, याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. तमिळनाडूच्या विधानसभा निवडणुकीत दणदणीत एन्ट्री करणाऱ्या विजय यांच्या सत्तास्थापनेच्या मार्गात मोठा अडथळा निर्माण झाला आहे. सर्वात मोठा पक्ष म्हणून विजय यांनी सरकार स्थापनेचा दावा केला खरा, पण राज्यपालांच्या एका निर्णयाने विजय यांच्या समर्थकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. बहुमतासाठी आवश्यक असलेल्या 118 आमदारांचे पाठबळ सिद्ध करण्यात विजय यांना अडचणी येत असल्याचे दिसत आहे.
विजय यांचा दावा आणि वास्तव
विजय यांनी राजभवनात जाऊन सत्ता स्थापनेचे पत्र दिले. "आम्ही योग्य वेळी बहुमत सिद्ध करू," असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. 7 मे रोजी शपथविधीची जय्यत तयारीही सुरू झाली होती. पण, एनडीटीव्हीला मिळालेल्या माहितीनुसार, राज्यपाल राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर यांनी बहुमताच्या दाव्यावर साशंकता व्यक्त केली आहे. विजय यांच्याकडे सध्या 108 आमदार आहेत, जे बहुमताच्या आकड्यापेक्षा 10 ने कमी आहेत. मंगळवारी विजय यांची विधीमंडळ गटनेते म्हणून एकमताने निवड करण्यात आली. त्यानंतर आज त्यांनी राज्यपालांची भेट घेतली. आता राज्यपालांच्या भूमिकेमुळे हा शपथविधी सोहळा लांबणीवर पडण्याची दाट शक्यता आहे. तमिळनाडूच्या राजकारणात आता 'वेट अँड वॉच'ची परिस्थिती निर्माण झाली आहे.
#WATCH | Chennai: TVK chief Vijay meets Tamil Nadu Governor Rajendra Arlekar at the Lok Bhavan and stakes claim to form the Government in the State.
— ANI (@ANI) May 6, 2026
(Video: Lok Bhavan, Tamil Nadu) pic.twitter.com/wCwfKQDhzM
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world