धाराशिवचे पालकमंत्री तानाजी सावंत यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार ओमराजे निंबाळकर यांच्यासह शिवसेना ठाकरे गटाचे आमदार कैलास पाटील यांच्यावर जोरदार टीका केली. ही टीका करताना तानाजी सावंत यांची जीभ घसरली. धाराशिव येथील ढोकी कारखान्यात आज शिवसेनेच्या शिंदे गटाचा कार्यकर्ता मेळावा पार पडला तेथे ते बोलत होते.
नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी धाराशिवमधून महायुतीच्या उमेदवार अर्चना पाटील यांना विजयी करण्यासाठी कामाला लागा. राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून धनंजय सावंत यांना घड्याळाच्या तिकिटावर लोकसभा लढवण्याची ऑफर होती, असंही तानाजची सावंत यांनी म्हटलं आहे.
(नक्की वाचा - शिवसेना ठाकरे गटाचा वचननामा जाहीर; शेतकरी, तरुणांसाठी मोठी घोषणा)
शिवसैनिकांनी व पदाधिकाऱ्यांनी सांगितलं की, आपल्याला घड्याळाच्या तिकिटावर वैयक्तिक आपल्या घरातील माणूस नको आहे. त्यामुळे मी माझ्या शिवसैनिकांचा आदेश पाळला व अजितदादांना कळवले, कुणालाही तिकीट द्या. माझ्या कडवट शिवसैनिकांसह हा विजय दिन साजरा करू, असेही अजित पवारांना मी सांगितलं असल्याचं तानाजी सावंत यांनी सांगितलं.
शेतकऱ्यांची कष्टाची साखर विकली
पुढे बोलताना सावंत यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार ओमराजे निंबाळकर आणि उद्धव ठाकरे गटाचे आमदार कैलास पाटील यांच्यावर जोरदार निशाणा साधला. तुला लोकसभेत बसवण्यासाठी आम्ही जीवाचं रान केलं. या तानाजी सावंतने तुझ्यासाठी या शेतकऱ्यांच्या कष्टाची साखर गोडाऊनला होती, ती ६० लाख क्विंटल तुझ्यासाठी विकली, असं सावंत यांनी म्हटलं.
नक्की वाचा- दहावी पास, दोन वेळा खासदार, शिंदेंच्या उमेदवाराची संपत्ती 1 अब्ज 31 कोटी 85 लाख
नेमकं काय म्हणाले तानाजी सावंत?
तानाजी सावंत यांनी ओमराजे निंबाळकर आणि कैलास पाटील यांना काळू-बाळू असं म्हटलं. आपल्या प्रचाराची दिशा ठरवण्याआधीच काळू-बाळू यांनी वेगळा प्रचार सुरू केला आहे. २०१९ मध्ये रवी सरांच तिकिट कट केलं. त्याला कारणीभूत मी ६० टक्के तर उद्धव ठाकरे ४० टक्के आहेत. काळू - बाळू यांना जिल्ह्यातील जनता बळी पडणार नाही, अशी टीका तानाजी सावंत यांनी केली.