जाहिरात
Story ProgressBack

दहावी पास, दोन वेळा खासदार, शिंदेंच्या उमेदवाराची संपत्ती 1 अब्ज 31 कोटी 85 लाख

Read Time: 2 min
दहावी पास, दोन वेळा खासदार, शिंदेंच्या उमेदवाराची संपत्ती 1 अब्ज 31 कोटी 85 लाख
पिंपरी चिंचवड:

सूरज कसबे

दहावी पास... दोन वेळा खासदार... संपत्ती मात्र 1 अब्ज 31 कोटी 85 लाख... तुम्हाला विश्वास बसणार नाही. पण हे खरं आहे. ही संपत्ती आहे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे यांची. त्यांनी मावळ लोकसभा मतदार संघातून उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यावेळी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रातून त्यांची संपत्ती किती याचा उलगडा झाला आहे. त्यांच्या संपत्तीचे आकडे समोर आल्याने अनेकांच्या भूवया मात्र उंचावल्या आहेत. विशेष म्हणजे 2014 साली त्यांच्याकडे 66 कोटींची संपत्ती होती. त्यात गेल्या दहा वर्षात भरमसाट वाढ झाल्याचे समोर आले आहे. 

हेही वाचा - 'उबाठा' च नाही तर भाजपासह 'या' पक्षांनाही निवडणूक आयोगानं बजावलीय नोटीस

  
श्रीरंग बारणेंची संपत्ती किती? 

मावळचे  लोकसभा मतदार संघाचे महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांनी सोमवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यावेळी त्यांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रातून ते अब्जावधी असल्याचे स्पष्ट झाले आहे. केवळ दहावी पास शिक्षण असलेल्या श्रीरंग बारणे आणि त्यांची पत्नी सरिता यांची एकत्रित संपत्ती गेल्या दहा वर्षांत अब्जावधींच्या घरात  गेली आहे.
बारणेंनी यांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात पत्नीच्या संपत्तीचाही उल्लेख केला आहे. त्यांनी व्यवसाय म्हणून शेती, विट कारखानदारी, बांधकाम व्यवसाय असल्याचे प्रतिज्ञापत्रात नमूद केले आहे. त्यांनी दिलेल्या प्रतिज्ञापत्रात 1 अब्ज 31 कोटी 85 लाख 92 हजार 631 रूपयांची संपत्ती असल्याचे स्पष्ट केले आहे. तसेच ८५ लाख रूपये कर्ज असल्याचाही उल्लेख आहे. 

रोख रक्कम

श्रीरंग बारणे -  26 लाख रुपये
सरिता बारणे - 12 लाख रुपये

श्रीरंग बारणेंच्या आलिशान गाड्या

मर्सिडीज बेन्झ -    किंमत 1 कोटी 23 लाख 72 हजार 200

टोयोटो फॉर्च्युनर - किंमत 40 लाख 12 हजार 475 रुपये

टोयोटा इनोव्हा   - किंमत 21 लाख 16 हजार 609

श्रीरंग बारणे यांच्याकडे दागिने किती? 

हिऱ्याची अंगठी - किंमत  11 लाख 55 हजार 22 रुपये
सोने 479  ग्रॅम  - किंमत   31 लाख 50 हजार रुपये
घड्याळ -  50 हजार रुपये
मोबाईल -  44 हजार 500 रुपये
रिव्हॉल्व्हर -35 हजार रुपये

पत्नी सरिता बारणे यांचे दागिने

कर्णकुंड्या -     5 लाख 50 हजार रुपये
हिरे -              1 लाख 14 हजार 33 रूपये
सोने 743 ग्रॅम   51 लाख 44 हजार 203 रुपये
चांदी - 9 किलो 270 ग्रॅम  7 लाख 28 हजार 597 रुपये
घड्याळ - 30 हजार रुपये
मोबाईल - 40 हजार रुपये

डार्क मोड/लाइट मोड बदलण्यासाठी
Our Offerings: NDTV
  • मध्य प्रदेश
  • राजस्थान
  • इंडिया
  • मराठी
  • 24X7
Choose Your Destination