जाहिरात

Thane News ठाण्यात खळबळ! प्रताप सरनाईकांच्या मुलाची निवडणुकीतून माघार; पत्रात लिहिलं माघार घेण्याचं मोठं कारण

Thane Municipal Election 2026: ठाण्यातील शिवसेनेचे नेते आणि परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे पुत्र पूर्वेश सरनाईक यांनी महापालिका निवडणूक न लढवण्याचा मोठा निर्णय घेतला आहे.

Thane News  ठाण्यात खळबळ! प्रताप सरनाईकांच्या मुलाची निवडणुकीतून माघार; पत्रात लिहिलं माघार घेण्याचं मोठं कारण
Purvesh Sarnaik : प्रताप सरनाईक यांच्या मुलानं निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला आहे.
मुंबई:

विशाल पाटील, प्रतिनिधी

Thane Municipal Election 2026:  ठाणे महानगरपालिका निवडणुकीच्या धामधुमीत राजकीय वर्तुळातून एक वेगळी बातमी समोर आलीय. ठाण्यातील शिवसेनेचे नेते आणि परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे पुत्र पूर्वेश सरनाईक यांनी निवडणूक न लढवण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. सरनाईक हे यापूर्वी महापालिकेत नगरसेवक होते. अनेक दिग्गज नेत्यांनी आपल्या मुलांना तिकीट मिळावं म्हणून जोरदार प्रयत्न केले. शिवसेनेनंही अनेक नेत्यांच्या मुलांना महापालिकेची उमेदवारी दिली आहे. पण, त्याचवेळी पूर्वेश सरनाईक यांनी त्यांची जागा कार्यकर्त्यांसाठी सोडली आहे. 

निवडणूक लढवण्यास  नकार

ठाणे महानगरपालिकेची निवडणूक 15 जानेवारी रोजी पार पडणार आहे. आज म्हणजेच 30 डिसेंबर रोजी उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस  होता. त्याच दिवशी  पूर्वेश सरनाईक यांचे एक पत्र सोशल मीडियावर वेगाने व्हायरल झाले आहे. या पत्रामध्ये त्यांनी आपण यंदा प्रभाग क्रमांक 14 मधून निवडणूक लढवणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. 

विशेष म्हणजे, ही जागा माझ्याऐवजी एखाद्या प्रामाणिक आणि सच्चा शिवसैनिकाला द्यावी, अशी मागणी त्यांनी पक्षश्रेष्ठींकडे केली आहे.

( नक्की वाचा : BMC Election 2026 : ठाकरेंची साथ आणि अमराठी उमेदवारांचा हात! मनसेची 18 जणांची पहिली यादी जाहीर, वाचा सर्व नावं )

घराणेशाहीला फाटा देत कार्यकर्त्याला संधी

राजाचा मुलगाच राजा बनणार नाही, तर जो खरोखर हक्कदार असेल तोच राजा बनेल, अशा आशयाचं पूर्वेश सरनाईक यांचं पत्र सोशल मीडियावर व्हायरल झालंय. पूर्वेश 2017 साली झालेल्या ठाणे महापालिकेच्या निवडणुकीत विजयी झाले होते. मात्र, यंदा त्यांनी स्वतःहून निवडणुकीच्या रिंगणातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. 

Latest and Breaking News on NDTV

सहा महिन्यांपूर्वीच घेतला होता निर्णय

आपल्या पत्रात पूर्वेश सरनाईक यांनी स्पष्ट केले आहे की, निवडणूक न लढवण्याचा हा निर्णय त्यांनी अचानक घेतलेला नाही. साधारण सहा महिन्यांपूर्वीच त्यांनी यावर सखोल विचार केला होता आणि तशी कल्पना पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वालाही दिली होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि प्रताप सरनाईक यांच्या मार्गदर्शनाखाली एखाद्या निष्ठावंत कार्यकर्त्याला संधी मिळावी, हाच यामागचा मुख्य उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

( नक्की वाचा : Sharad Pawar : शरद पवार 'एनडीए'मध्ये जाणार? पिंपरी-चिंचवडमधील पवारांच्या एकजुटीचा काय आहे अर्थ? )

पुढे काय करणार?

पूर्वेश सरनाईक सध्या शिवसेनेच्या युवा सेनेचे कार्याध्यक्ष म्हणून काम पाहत आहेत. पक्षाने दिलेली ही जबाबदारी मोठी असून, तळागाळातील तरुणांना संघटित करणे आणि नव्या नेतृत्वाला संधी देणे हेच शिवसेनेचे खरे ध्येय असल्याचे त्यांनी म्हटले आहे. निवडणूक लढवणार नसलो तरी प्रभाग क्रमांक 14 मधील जनतेशी असलेले माझे नाते कायम राहील आणि त्यांच्या प्रश्नांसाठी मी सदैव उपलब्ध असेन, असं आश्वासनही त्यांनी मतदारांना दिली आहे.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com