जाहिरात

BMC Election 2026 : ठाकरेंची साथ आणि अमराठी उमेदवारांचा हात! मनसेची 18 जणांची पहिली यादी जाहीर, वाचा सर्व नावं

BMC Election 2026 : मुंबई महापालिका निवडणुकीच्या रणांगणात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पहिल्या यादीत 3 अमराठी उमेदवारांना संधी दिली आहे.

BMC Election 2026 : ठाकरेंची साथ आणि अमराठी उमेदवारांचा हात! मनसेची 18 जणांची पहिली यादी जाहीर, वाचा सर्व नावं
BMC Election 2026 : मनसेनं पहिल्या यादीत धक्कातंत्राचा वापर केलाय.
मुंबई:

BMC Election 2026 : मुंबई महापालिका निवडणुकीच्या रणांगणात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आपले पहिले पाऊल टाकले आहे. राज ठाकरे यांच्या मनसेने 18 उमेदवारांची पहिली अधिकृत यादी प्रसिद्ध केली आहे.  यंदा मनसे आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना (यूबीटी) एकत्र मिळून ही निवडणूक लढवत असल्यामुळे या पहिल्या यादीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया संपायला काहीच अवधी शिल्लक असताना ही घोषणा करण्यात आली आहे.

राजकीय रणनीती आखताना राज ठाकरे यांनी आपल्या खास शैलीचा वापर या यादीत केल्याचे पाहायला मिळते. या यादीमध्ये काही धक्कादायक आणि काही अपेक्षित चेहरे देण्यात आले आहेत.

शुभ अंक 9 चा खास विचार

राज ठाकरे हे 9 हा अंक आपल्यासाठी अत्यंत शुभ मानतात, हे सर्वांनाच ठाऊक आहे. या पहिल्या यादीतही त्याचा प्रत्यय आला आहे. मनसेने जाहीर केलेल्या उमेदवारांची संख्या 18 आहे. 1 आणि 8 या अंकांची बेरीज केली असता ती 9 येते. आपल्या राजकीय आयुष्यातील महत्त्वाच्या टप्प्यावर राज ठाकरे नेहमीच या अंकाचा आधार घेताना दिसतात, त्यामुळेच ही पहिली यादीही 18 उमेदवारांचीच असल्याचे बोलले जात आहे.

मराठीच्या मुद्यासोबतच अमराठी कार्ड

मराठी माणसाच्या हक्कासाठी नेहमीच आग्रही भूमिका घेणाऱ्या मनसेने यावेळेस आपल्या पहिल्या यादीत 3 अमराठी उमेदवारांना स्थान दिले आहे. यात वॉर्ड क्रमांक 21 मधून सोनाली देव मिश्रा, वॉर्ड क्रमांक 81 मधून शबनम शेख आणि वॉर्ड क्रमांक 110 मधून हरिनाक्षी मोहन चिराथ यांना उमेदवारी देण्यात आली आहे. मुंबईतील सर्वसमावेशक मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी राज ठाकरे यांनी हे पाऊल उचलल्याचे मानले जात आहे.

( नक्की वाचा : Sharad Pawar : शरद पवार 'एनडीए'मध्ये जाणार? पिंपरी-चिंचवडमधील पवारांच्या एकजुटीचा काय आहे अर्थ? )

मनसेची पहिली यादी खालीलप्रमाणे

वॉर्ड क्र. 10 – विजय कृष्णा पाटील
वॉर्ड क्र. 11 – कविता बागुल माने
वॉर्ड क्र. 18 – सदिच्छा मोरे
वॉर्ड क्र. 20 – दिनेश साळवी
वॉर्ड क्र. 21 – सोनाली देव मिश्रा
वॉर्ड क्र. 27 – आशा विष्णू चांदर
वॉर्ड क्र. 68 – संदेश देसाई
वॉर्ड क्र. 81 – शबनम शेख
वॉर्ड क्र. 84 – रूपाली दळवी
वॉर्ड क्र. 106 – सत्यवान दळवी
वॉर्ड क्र. 110 – हरिनाक्षी मोहन चिराथ
वॉर्ड क्र. 129 – विजया गिते
वॉर्ड क्र. 133 – भाग्यश्री अविनाश जाधव
वॉर्ड क्र. 150 – सविता माऊली थोरवे
वॉर्ड क्र. 152 – सुधांशू दुनबाळे
वॉर्ड क्र. 183 – पारूबाई कटके
वॉर्ड क्र. 192 – यशवंत किल्लेदार
वॉर्ड क्र. 102 – अनंत हजारे
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com