Modi Cabinet : मोदींंच्या मंत्रिमंडळात 6 माजी मुख्यमंत्र्यांचा समावेश

नरेंद्र मोदींसह सह माजी मुख्यमंत्र्यांनी देखील मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. हे सात माजी मुख्यमंत्री आता एनडीए सरकारच्या नव्या मंत्रिमंडळाचा भाग असतील.

जाहिरात
Read Time: 2 mins
New Delhi:

नरेंद्र मोदी यांनी देशाचे पंतप्रधान म्हणून सलग तिसऱ्यांना शपथ घेतली आहे. नरेंद्र मोदींसह सह माजी मुख्यमंत्र्यांनी देखील मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. हे सात माजी मुख्यमंत्री आता एनडीए सरकारच्या नव्या मंत्रिमंडळाचा भाग असतील.

(नक्की वाचा - Modi 3.0: एकही खासदार नाही, तरीही सलग तिसऱ्यांदा केंद्रात मंत्री, 'लकी' रामदास आठवले)

माजी मुख्यमंत्र्यांमध्ये मध्य प्रदेशचे शिवराज सिंह चौहान, उत्तर प्रदेशचे राजनाथ सिंह, हरियाणाचे मनोहर लाल खट्टर, आसामचे सर्बानंद सोनोवाल, कर्नाटकचे एचडी कुमारस्वामी आणि बिहारचे जीतन राम मांझी यांचा समावेश आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींसह यापैकी पाच माजी मुख्यमंत्री भारतीय जनता पक्षाचे आहेत. तर कुमारस्वामी आणि जीतनराम मांझी हे अनुक्रमे जेडी(एस) आणि हिंदुस्थानी अवाम मोर्चाचे प्रतिनिधित्व करतात.

(नक्की वाचा- Modi 3.0: केरळमध्ये भाजपचे खाते उघडले, सुरेश गोपींना थेट मिळाले मंत्रिपद)

मोदींच्या मंत्रिमंडळातील 30 कॅबिनेट मंत्री

1. नरेंद्र मोदी 
2. राजनाथ सिंह  
3. अमित शाह
4. नितीश गडकरी 
5. जगतप्रकाश नड्डा 
6. शिवराजसिंह चौहान 
7. निर्मला सीतारमण 
8. एस. जयशंकर
9. मनोहरलाल खट्टर
10. एच डी कुमारस्वामी 
11. पीयूष गोयल
12. धर्मेंद्र प्रधान
13. जीतन राम मांझी
14. राजीव रंजन सिंह 
15. सर्वानंद सोनोवाल 
16. किंजरप्पू राममोहन नायडू 
17. प्रल्हाद व्यंकटेश जोशी 
18. जुवेल उराम 
19. गिरीराज सिंह
20. अश्विनी वैष्णव
21. ज्योतिरादित्य शिंदे 
22. भूपेंद्र यादव
23. गजेंद्रसिंह शेखावत 
24. अन्नपूर्णा देवी 
25. किरण रिजीजू 
26. हरदीपसिंह पुरी
27. मनसुख मांडविया 
28. जी किशन रेड्डी
29. चिराग पासवान
30. सी आर पाटील 

Advertisement

(हेडलाइन वगळता या बातमीमध्ये एनडीटीव्ही टीमने काहीही बदल केलेले नाहीत. ही सिंडीकेट फीडद्वारे प्रकाशित करण्यात आली आहे.)