उद्धव ठाकरे म्हणतात, "नरेंद्र मोदी 4 जूननंतर पंतप्रधान राहणार नाहीत"

शिवसेनेने सगळी सडकी पाने टाकून दिली आहेत. हा सगळा कचरा गोळा भाजपने जमा केला आहे. भाजप हा कचरा जमा करणारा पक्ष झाला आहे, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली.

जाहिरात
Read Time: 2 mins

महाविकास आघाडीच्या परिवर्तन सभेत उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महायुतीवर हल्लाबोल केला. नरेंद्र मोदी 4 जूननंतर पंतप्रधान राहणार नाहीत. तुम्ही 4 जूननंतर फक्त नरेंद्र मोदी राहाल, पंतप्रधान राहणार नाहीत, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं. महाराष्ट्र शाहू-फुले-आंबेडकर यांचा आहे, तो मोदी-शाहांना कदापी होऊ देणार नाही. तुम्ही कितीही प्रयत्न करत तुम्हाला ते शक्य होणार नाही, असा घणाघातही उद्धव ठाकरेंनी केला.

(NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

शिवसेनेने सगळी सडकी पाने टाकून दिली आहेत. हा सगळा कचरा गोळा भाजपने जमा केला आहे. भाजप हा कचरा जमा करणारा पक्ष झाला आहे. ही पहिली निवडणूक अशी आहे, जिथे नरेंद्र मोदींना प्रचाराची दिशाच सापडत नाही. देशातील जनता काहीही केलं तरी त्यांचे ऐकेल असं त्यांना वाटत होतं, मात्र आता तसं होताना दिसत नाही. त्यांनी आधी 'अब की 400 पार'चा नारा दिला होता. आम्हीही 'अब की बार भाजपा तडीपार' असा नारा दिला, अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी नरेंद्र मोदींवर निशाणा साधला. 

नक्की वाचा- महाराष्ट्राला नरेंद्र मोदींकडून 7 अपेक्षा, राज ठाकरेंनी त्यांच्यासमोरच बोलून दाखवल्या

मचा महाराष्ट्रावरचा आकस दिसतोय

महाराष्ट्राने तुमच्यावर दोनदा विश्वास ठेवला. मात्र महाराष्ट्रासाठी तुम्ही काय केलं. मी देखील तुम्हाला विजयी करण्यासाठी सामील होतो. मला याचा पश्चाताप होतो. मात्र आज तुम्ही महाराष्ट्र लुटायला निघालात, मुंबई लुटली. तुमचा महाराष्ट्रावरचा आकस दिसतोय. मुंबई तुम्ही भिकारी करायला निघालात, अशी टीका देखील उद्धव ठाकरे यांनी केली. 

(वाचा - मुंबईत वाकयुद्ध रंगणार! मोदी राज एकाच मंचावर तर केजरीवालही ठाकरेंच्या जोडीला)

मुंबईतील रोड शोमध्ये उन्माद दिसला

दोन दिवसांपूर्वी मोदींचा मुंबईत रोड शो पाहायला मिळाला. या रोड शोमध्ये त्यांचा उन्माद पाहायला मिळाला. जिथे दोन दिवसांपूर्वी होर्डिंग पडून अनेक जणांनी आपला जीव गमावला. त्यांचं रक्तही सुकलं नव्हतं. तिथे तुम्ही रोड शो केला. ढोल-ताशे वाजवले, लेझीम, फुलं उधळत रोड शो केला. एवढे निर्दयी झालात तुम्ही?, असा सवालही उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला. 

Topics mentioned in this article