महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाषणाची सुरुवात पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यानंतर हिंदुस्थानचे तिसऱ्यांदा पंतप्रधान बनणारे नरेंद्र मोदीजी... अशी केली. यावेळी राज ठाकरे यांनी विरोधकांवर सडकून टीका केली. राज ठाकरे यांनी यावेळी पंतप्रधान मोदी यांच्या धाडसी निर्णयांचा पाढाच वाचून दाखवला.
नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान झाल्यानंतर महाराष्ट्राच्या त्यांच्याकडून काय अपेक्षा असणार आहेत, त्या देखील राज ठाकरे यांनी सांगितल्या. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी व्यासपीठावरच उपस्थित होते.
'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
नरेंद्र मोदींकडून महाराष्ट्राला काय हवंय?
1. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा ही मागणी अनेक वर्षांपासूनची आहे. तुम्ही पंतप्रधान झाल्यानंतर मराठी भाषेला जो सन्मान मिळाला पाहिजे तो मिळेल, अशी अपेक्षा आहे.
2. ज्या मराठा साम्राज्याने देशावर राज्य केलं, त्या मराठा साम्राज्याचा इतिहास लहाणपणापासून देशातील शाळांमध्ये शिकवला जावा. त्यामुळे देशातील मुलांना मराठ्यांचा इतिहास कळेल.
3. छत्रपती शिवाजी महाराजांचं अरबी समुद्रातलं स्मारक होईल तेव्हा होईल. पण शिवछत्रपतींचं खरं वैभव त्यांचे गडकिल्ले आहे. या गड-किल्ल्यांना पूर्वीचं ऐतिहासिक वैभव प्राप्त व्हावं. त्यासाठी एक समिती स्थापन व्हावी. जेणेकरुन येणाऱ्या पिढीला शिवरायांचा इतिहास कळावा, अशी विनंती आहे.
वाचा - मुंबईत वाकयुद्ध रंगणार! मोदी राज एकाच मंचावर तर केजरीवालही ठाकरेंच्या जोडीला
4. मागील 10 वर्षात देशभरात उत्तम रस्ते बनवले गेले. मात्र मागील 18-19 वर्षांपासून मुंबई-गोवा महामार्ग प्रलंबित आहे. तो लवकरात लवकर व्हावा.
5. देशातील मुस्लिमांचं देशावर प्रेम आहे. पण काही मुठभर आहेत, ज्यांचा महाविकास आघाडीला पाठिंबा आहे. त्यांचा उद्देश योग्य नाही. त्यांना डोकं वर काढण्यासाठी काँग्रेससारखा पर्याय हवाय. ओवेसी सारख्यांचे अड्डे एकदा तपासून घ्या, तिथे देशाचं सैन्य घुसवा.
6. मुंबईतील रेल्वेला जास्तीत जास्त निधी येणाऱ्या काळात द्या. जेणेकरुन मुंबईकराचा प्रवास सुखकर होईल.
वाचा - लोकसभा निवडणुकीतील मतदानावरुन दोन गटात तुंबळ हाणामारी; महिला सरपंचाचे कुटुंब गंभीर जखमी
राज ठाकरे यांनी यावेळी पंतप्रधान मोदीच्या धाडसी निर्णयांचा देखील पाढाच वाचून दाखवला. बाबरी मशिदीचा ढाचा पाडला, त्यावेळी आमच्या अनेक कारसेवकांनी बलिदान दिलं. मात्र त्यानंतर राम मंदिर होऊ शकेल की नाही असं वाटत होतं. मात्र मोदीजी होते म्हणून तेथे राम मंदिर होऊ शकलं, अन्यथा ते झालंच नसतं, असं राज ठाकरे यांनी म्हटलं.
स्वातंत्र्यानंतर 370 कलम रद्द होण्याची फक्त चर्चा होती, मात्र मोदीजींनी ते कलम रद्द करुन दाखवलं. त्यामुळे काश्मीर भारताचाच एक भाग आहे हे आता सिद्ध झालं. तिहेरी तलाक रद्द केला, असे अनेक धाडसी निर्णय पंतप्रधान मोदीजींनी घेतले, याची आठवण राज ठाकरे यांनी करुन दिली. मोदीची आता मी तुमच्यासाठी पुढच्यासाठी पुढील पाच वर्षांसाठी उभा आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world