- उद्धव ठाकरे यांनी नाशिकमध्ये भाजपवर आरोप करत त्यांच्या हिंदूत्वावर प्रश्न उपस्थित केला
- त्यांनी भाजपला उपट सुंभांचा पक्ष म्हटले आणि भ्रष्टाचार, चोरी, दरोडेखोरीसारखे आरोप लावले
- ठाकरे बंधूंनी एकत्र येत नाशिककरांना चांगलं जिवन देण्याचा आश्वासन दिलं आहे.
Uddhav Thackeray Nashik Sabaha: आमच्या हिंदूत्वावर बोट उचलता मग अकोटमध्ये एमआयएम सोबत युती केली त्यावेळी कुठे गेलं होतं तुमचं हिंदूत्व असा खडा सवाल करत, उद्धव ठाकरे यांनी आपल्या पहिल्याच सभेत भाजपला धारेवर धरलं. त्यांनी एकामागोमाग एक आरोपांचा धडाका लावत भाजपलाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं. तुम्ही तुमच्या पक्षाच्या ध्वजातला हिरवा रंग कधी काढणार आहात असा प्रश्नही त्यांनी यावेळी केला. भाजप हा उपट सुंभांचा हा पक्ष आहे अशी टिका ही त्यांनी यावेळी केली. ठाकरे बंधूंची पहिली संयुक्त सभा नाशिकमध्ये झाली. त्यावेळी उद्धव ठाकरे बोलत होते. आम्ही दोन्ही ठाकरे भाऊ जे बोलतो ते करून दाखवतो असं ही ते यावेळी म्हणाले.
भाषणाच्या सुरूवातीपासूनच उद्धव यांनी भाजपवर निशाणा साधला. भाजपचं हिंदूत्व हे खरं की चुनावी हिंदूत्व असा सवाल त्यांनी केला. राम मंदिर केलं म्हणून भाजपने डंका पिटला. पण प्रभू रामाने वास्तव्य ज्या नाशिकमध्ये होतं तिथली सर्व झाडं यांनीच कापली. पुढची पुढी ज्यावेळी विचारेल प्रभू राम कुठे राहिले होते त्यावेळी नमो निवास त्यांना दाखवणार का असा टोला त्यांनी भाजपला लगावला. मी काँग्रेसबरोबर गेलो तर हिंदूत्व सोडलं असा आरोप केला. आता भाजपनं अकोटमध्ये एमआयएम सोबत युती केली तेव्हा तुमचे हिंदूत्व कुठे गेले? अशी विचारणा त्यांनी केली.
अंबरनाथमध्ये मिंध्याचं पायपुसणं केलं आणि याच भाजपने फेकून दिलं. भ्रष्टाचारी, चोर, दरोडेखोर भाजपवाले आपल्या पक्षात घेत आहेत. भ्रष्टचारी तेतूका मिळवाला, तेवढा भाजप पक्ष वाढवावा असं सध्या सुरू आहे. भाजप हा उपट सुंभांचा पक्ष आहे. आमच्यातले अनेक लोक पळवले. पण आमच्याकडे पोरांचा तोटा नाही. मोठी केलेली माणसं गेली असतील, पण ज्यांनी मोठं केलं ती माणसं आमच्या सोबत आहेत असं हीते यावेळी म्हणाले. ज्यांना राजकारणात पोरं होत नाही, त्यांना आमची पोरं घ्यावी लागत आहेत. हे काय शहर दत्त घेणार असा टोला त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लगावला. तुमच्या फडक्यातला म्हणजेच झेंड्यातला हिरवा रंग काढा मग आमच्यावर बोला. आमचं हिंदू व्यापक आहे. हिंदूत्व म्हणजे राष्ट्रीयत्व आहे. असं ही ते म्हणाले.
यावेळी त्यांनी मुळ भाजप कार्यकर्त्यांबाबत चिंता व्यक्त केली. शिवाय त्यांची किव येते असं ही ते म्हणाले. आज ही त्यांना सतरंज्या उचलाव्या लागत आहेत. पण कुणाच्या सतरंज्या ते उचलत आहेत. जे भ्रष्टाचारी आहेत. जे चोर आहेत. जे दरोडेखोर आहेत असं ही ते म्हणाले. हे काय भाजप कार्यकर्त्यांच्या नशिबी आलय. पक्ष वाढवायला तुम्हाला सलिम कुत्ता तुम्हाला चालतो, बिल्ली चालते, चुव्वा चालतो. ही सर्व बरबटलेली माणसं पक्षा घेतली आहे. त्यांनाच मुळ भाजपवाल्यांना डोक्यावर घेवून नाचावं लागत आहे. हेच तुमच्या नशिबी आलयं. हे तुम्हाला अपेक्षित होतं का असा प्रश्न ही त्यांनी केला.
आम्ही एकत्र आलो त्याच्या आदल्या दिवशी ज्याने फटाके फोडले तेच दुसऱ्या दिवशी भाजममध्ये गेले. देवयानी ताई त्यामुळे रडल्या. त्यांच्या बद्दल मला आदर आहे. तुम्ही तुमचं काम निष्ठेने करता. तुमची निष्ठा पक्षाशी आहे. पण तुम्ही जी निष्ठा बाळगता आहात तो पक्ष उपऱ्यांचा झाला आहे. असं देवयानी ताई म्हणाल्या सांगत त्यांनी भाजपची फिरकी घेतली. दलालांनी चुकीच ब्रिफींग केलं असं ही त्या म्हणाल्या होते. म्हणजेच भाजप हा दलालांचा पक्ष झाला आहे असं ही उद्धव यावेळी म्हणाले. नाशिकमध्ये गेल्या दोन वर्षातली ही माझी चौथी सभा आहे. आजच्या सभेला मला जास्त आनंद होत आहे. कारण या सभेत माझा भाऊ मनसेचा अध्यक्ष राज माझ्या सोबत आहे. भावी नगसेवक माझ्या सोबत आहेत. तुम्ही आमच्यावर विश्वास टाका आम्ही नाशिकचा विकास करू हा आमचा शब्द आहे असं ही उद्धव यावेळी म्हणाले.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world