Virar News: भाजपचा "रात्रीस खेळ चाले"?, 10 लाखांची कॅश, 2 कार्यकर्ते अन् BVA चा इंगा, रात्रीच्या अंधारात राडा

गाडीची झडती घेतली असता त्याच्याकडे भाजपाची पिशवी सापडली.

जाहिरात
Read Time: 2 mins
वाचा
Summary is AI-generated, newsroom-reviewed
  • महापालिका निवडणुकीसाठी प्रचाराचा मंगळवार हा शेवटचा दिवस आहे.
  • वसई विरार महापालिका हद्दीत भाजप आणि बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये पैसे वाटपाच्या कारणाने राडा झाला
  • नालासोपारा पूर्वेतील पेल्हार येथे संशयित व्यक्तीची गाडी बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी पकडली
आमच्या एआय सारांशामुळे मदत मिळाली?
आम्हाला नक्की कळवा.
वसई:

मनोज सातवी

महापालिका निवडणुकीसाठी प्रचाराचा आज मंगळवार शेवटचा दिवस आहे. त्यानंतर प्रचार थांबेल. तो पर्यंत जास्तीत जास्त मतदारापर्यंत पोहोचण्याचा प्रत्येक उमेदवाराचा प्रयत्न आहे. शिवाय रात्रीच्या वेळी ही या भेटीगाठी सुरू आहेत. अनेक ठिकाणी पैसे वाटपाच्या घटना ही समोर आल्या आहेत. त्यातून वाद ही झाले आहेत. कल्याण डोंबिवली, ठाणे, मुंबई यासह अन्य महापालिकांत पैसे वाटपाच्या बातम्या समोर येत आहेत. त्यात आता वसई विरार महापालिका हद्दीतही भाजप आणि बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांत जोरदार राडा झाला आहे.  

नालासोपारा पूर्वेला असलेल्या पेल्हार येथे रात्री दोनच्या सुमारास काही संशयीत हालचाली दिसून आल्या. एक संशय इसमाची गाडी लोकांनी पाठलाग करून अडवली. त्यानंतर त्याला पकडण्यात ही आले. त्याला तू कोण आहे याची विचारणा करण्यात आली. मात्र त्याने उडवा उडवीची उत्तर दिली. त्यानंतर त्याच्या गाडीची तिथल्या लोकांनी झाडाझडकी घेतली. हे सर्व कार्यकर्ते बहुजन विकास आघाडीचे होते. त्यांनीच ही गाडी पकडली होती. 

नक्की वाचा - BMC Election 2026: मुंबईत राडा! 'या' वॉर्डात दोन्ही शिवसेना भिडल्या; ठाकरेंच्या कार्यकर्त्याला बेदम मारलं

गाडीची झडती घेतली असता त्याच्याकडे भाजपाची पिशवी सापडली. शिवाय  गाडीच्या डिकीत एक मोठी प्लास्टिकची ही पिशवी होती. त्यात पाकीट तयार करण्यात आली होती. त्या पाकीटांमध्ये पैसे भरले होते. जवळपास दहा लाखांची रोकड तिथे जप्त करण्यात आली. तसेच त्याच्याकडे भाजपचे पत्रक आणि पट्टे देखील आढळले आहे. भाजप कार्यकर्त्यांकडून ही रोकड मतदारांना वाटण्यासाठी नेले जात होती, असा आरोप बविआच्या कार्यकर्त्यांनी केला आहे. 

What is PADU: काय आहे 'पाडू'? मुंबई महापालिका निवडणुकीत पहिल्यांदाच होणार वापर

या प्रकरणी दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आलं आहे. पेल्हार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बहुजन विकास आघाडीचे उमेदवार प्रफुल पाटील यांच्या तक्रारीवरून हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पाटील आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी हे पैसे पकडले आहेत. हे सर्व भाजप कडून सुरू असल्याचं आरोप त्यांनी केला आहे. वसई विरार महापालिकेत भाई ठाकूरांची बहुजन विकास आघाडी आणि भाजप यांच्यात थेट लढत आहे. भाई ठाकूरांच्या वर्चस्वाला धक्का देण्यासाठी भाजपने इथे तयारी केली आहे. 

Advertisement