नाशिक शिक्षक मतदारसंघातून शिंदे गटाचे किशोर दराडे विजयी; विवेक कोल्हे दुसऱ्या स्थानावर

किशोर दराडे दुसऱ्यांदा आमदार झाले आहेत. अपक्ष उमेदवार विवेक कोल्हे दुसऱ्या क्रमांकावर तर शिवसेना ठाकरे गटाचे संदीप गुळवे तिसऱ्या स्थानावर राहिले आहेत. 

Advertisement
Read Time: 2 mins

प्रांजल कुलकर्णी, नाशिक

विधानपरिषदेच्या नाशिक शिक्षक निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाचे किशोर दराडे विजयी झाले आहेत. किशोर दराडे दुसऱ्यांदा आमदार झाले आहेत. अपक्ष उमेदवार विवेक कोल्हे दुसऱ्या क्रमांकावर तर शिवसेना ठाकरे गटाचे संदीप गुळवे तिसऱ्या स्थानावर राहिले आहेत. 

'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

मुंबई पदवीधरमधून अनिल परब विजयी

मुंबई पदवीधर मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटाचे ॲड. अनिल परब 44 हजार 784 मते मिळवून विजयी झाले आहेत. या निवडणुकीत एकूण 67 हजार 644  मतदारांनी मतदान केले होते. त्यापैकी  64 हजार 222  मते वैध ठरली तर  3 हजार 422  मते अवैध ठरली.  जिंकून येण्यासाठी  32 हजार 112  इतक्या मतांचा निश्चित कोटा ठेवण्यात आला होता. ॲड.अनिल परब 44 हजार 784 मते मिळाली. तर भाजपच्या किरण शेलार यांना 18 हजार 772 मते मिळाली. 

नक्की वाचा- विधानपरिषद निवडणुकीत शेवटच्या क्षणी ट्विस्ट? मिलिंद नार्वेकर आज अर्ज दाखल करण्याची शक्यता

कोकण पदवीधरमधून निरंजन डावखरे विजयी

कोकण विभाग पदवीधर मतदारसंघात भाजपच्या निरंजन वसंत डावखरे यांनी बाजी मारली. निरंजन डावखरे यांनी 1 लाख 719 मते मिळवून विजयी निश्चित केला. काँग्रेसच्या कीर रमेश श्रीधर यांना 28 हजार 585 मते मिळाली. या निवडणुकीत एकूण 1 लाख 43 हजार 297  मतदारांनी मतदान केले होते. त्यापैकी 1 लाख 32 हजार 071 मते वैध ठरली तर 11 हजार  226 मते अवैध ठरली.  जिंकून येण्यासाठी  66 हजार 036  इतक्या मतांचा  कोटा ठेवण्यात आला. 

(नक्की वाचा: भाजपचं ठरलं? विधान परिषदेसाठी 'या' नेत्यांना मिळणार संधी)

मुंबई शिक्षकमधून ज मो अभ्यंकर विजयी

मुंबई शिक्षक मतदारसंघातून ठाकरे गटाचे जगन्नाथ मोतीराम अभ्यंकर 4 हजार 83 मते मिळवून विजयी झाले आहेत. या निवडणुकीत एकूण 12,000 मतदारांनी मतदान केले होते. त्यापैकी  11 हजार 598  मते वैध ठरली तर 402  मते अवैध ठरली.  जिंकून येण्यासाठी   5 हजार 800   इतक्या मतांचा निश्चित कोटा ठेवण्यात आला होता. 

Advertisement

Topics mentioned in this article