भाजपचे केंद्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांना पैशाचे वाटप करताना बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी पकडल्याचा दावा केला जात आहे. यावर आता आमदार क्षितीज ठाकूर यांनी काही धक्कादायक खुलासे केले आहेत. त्यामुळे आणखी खळबळ उडाली आहे. ज्या वेळी बविआच्या कार्यकर्त्यांनी हॉटेलवर धडक दिली त्यावेळी विनोद तावडे हे गोदामात लपून बसले होते. ते जर कार्यकर्त्यांना भेटायला आले होते तर ते गोदामात काय करत होते असा सवाल ठाकूर यांनी केला आहे. शिवाय येवढा मोठा नेता विरारमध्ये येतो पण त्याची कल्पना पोलिसांना नसते हे कसे शक्य आहे असंही त्यांनी सांगितलं. या सर्व प्रकरणानंतर क्षितीज ठाकूर यांनी पत्रकार परिषद घेत अनेक मुद्दे उपस्थित केले.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
मतदानाच्या 48 तास आगोदर बाहेरचा कोणीही व्यक्त मतदार संघात येवू शकत नाही. अशा वेळी विनोद तावडे हे आधी वाड्याला नंतर विरारमध्ये आले. ते सकाळी वाड्याला काय करत होते असा प्रश्नही क्षितीज ठाकूर यांनी केला. तावडें सारखा मोठा नेते विरार सारख्या ठिकाणी येतो त्याची माहिती पोलिसांना नव्हती हे कसे शक्य आहे. जर पोलिसांना ते येणार आहेत हे माहित नव्हतं तर मग तावडे लपून का आले? आणि जर पोलिसांना माहित होतं तर त्यांना कारवाई का केली नाही असा प्रश्नही त्यांनी केला.
ट्रेंडिंग बातमी - हा 'नोट जिहाद' आहे का? ठाकरेंचा शिंदे-पवार-फडणवीसांना सवाल
ज्यावेळी आमचे कार्यकर्ते हॉटेलवर धडकले त्यावेळी विनोद तावडे हे गोदामात लपून बसले होते. त्यावेळी आम्हाला दहा ते बार डायरी मिळाल्या. त्यात अनेकींची नावं होती. त्यांच्या नावा समोर किती पैसे दिले आहेत याचा उल्लेख होता. मात्र पोलिस आल्यानंतर तिथे असलेल्या अनेकांना कोणच्याही प्रकारचे चेकींग न करता बाहेर काढण्यात आलं असा आरोप क्षितीज ठाकूर यांनी केला आहे. तावडे जर का कार्यकर्त्यांना भेटायला आले होते तर ते गोदामात काय करत होते? त्यांनी हॉटेलच्या हॉलमध्ये बसायला हवं होतं. तावडे हे लपून आले होते.
ट्रेंडिंग बातमी - "माझी चूक झाली, मला इथून सोडवा, विनोद तावडेंचा फोन", हिंतेंद्र ठाकूरांचा दावा
डायरीत नावं आणि किती पैसे दिले आहेत याची नोंद होती. त्यात वसईतल्या नेत्यांचे, समाजातील लोकांची नावं होती. तिथं असणाऱ्या लोकांकडे काही बॅगा होत्या. त्या बॅगा आम्ही ताब्यात घेत होतो. पण त्या त्यांनी दिल्या नाहीत. जोपर्यंत चौकशी होत नाही तोपर्यंत आमचे कार्यकर्ते हलायला तयार नव्हते. संपुर्ण हॉटेल बूक केलं होतं. ज्या वेळी आम्ही आलो त्या वेळी पळापळ झाली. अनेक जण बाथरूम, रूम, किचन, जिन्यात लपलेले आढळले. इथले भाजप उमेदवार राजन नाईक हे तर महिलांच्या घोळक्यात लपून बसले होते असा आरोही ठाकूर यांनी केला.
भाजप एकीकडे रामाच नाव घेत आहे. दुसरीकडे पैशांचं वाटप करत आहे. हे भाजपच्या जुन्या नेत्यांसह आरएसएसच्या लोकांनाही पटलेलं नाही असंही ते म्हणाले. वसई तालुक्यात अशा पद्धतीने कोणी मतदान करणार नाही. या प्रकरणी निवडणूक आयोग आणि पोलिसांनी कारवाई करण्याची गरज आहे. ती कितपत होईल हे माहित नाही असंही ठाकूर म्हणाले. पण आयोगाने ऑन रेकॉर्ड पैसे पकडले आहे. त्यामुळे कारवाई झालीच पाहीजे असंही ते म्हणाले.